अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान घडला भयंकर प्रकार! 25 लाखांचा फटका; 8 हजार पोलीस असतानाही…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बारामती :- “उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातामध्ये दुर्देवी निधन झालं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारी रोजी बारातीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या पार्थिवावर लाखो समर्थकांच्या आणि बड्या राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र या अंत्यविधीदरम्यान चोरट्यांनी हात साफ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या अंत्यविधीदरम्यान किमान 15 जणांचे 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामतीमधून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा चोरटयांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
सोनसाखळ्या व दागिने चोरण्याचा प्रयत्न
अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी 29 जानेवारी रोजी लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता. या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या व दागिने चोरटयांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या पैकी काही चोरटयांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले.
आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त
विशेष म्हणजे त्या दिवशी बारामतीत आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. ज्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर चोरटयांच्या टोळीने हात साफ करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी अक्षरशः हजारो पोलिस उपस्थित असतानाही धाडस दाखवित या चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात आठ ते दहा तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.
कोण आहेत तक्रारदार?
या मध्ये राजकुमार बाबूराव आठवले (राहता गेवराई, जिल्हा बीड), महम्मद अनिस महमद युनुस, येजाज भग्गू मिरावले, मोहमद सादिक मोहमद सिराज (सर्व राहता दिग्रस, जिल्हा यवतमाळ), बाळू बबन बोत्रे (राहता पळसदेव, तालुका इंदापूर) व त्याचे दोन मित्र अशा संशयितांविरुध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी रणजित बाबासाहेब जाधव व रमेश लालासाहेब वाबळे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान विजया गजानन पवार यांचे गंठण, नीलेश लक्ष्मण काटे, अशोक मोरे, मनोहर जाधव, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, विश्वजित तुपे, सतीश सातकर, अमोल ताटे, अंकुश दिघे, प्रशांत सपकळ, विकास भागवत यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरटयांनी चोरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अजित पवारांचं स्मारक
दरम्यान, ज्या ठिकाणी अजित पवारांवर अत्यंसंस्कार झाले त्याच ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांच्या नावाने स्मारक उभारण्यात येणार असून मुंबईला रवाना होण्याआधी शरद पवारांनी स्मारकासाठीच्या जागेची पहाणी केल्याचं दिसून आलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..