“जुनं सामान नव्या डब्यात…”; बजेटवरुन रोहिणी आचार्य यांचा सरकारवर जोरदार निशाणा….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी, सामान्य माणसासाठी मात्र कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही.
यावरून आता सत्ताधारी पक्षाचे नेते या बजेटचे समर्थन करत असतानाच, दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते सरकारवर टीका करत आहेत. या बजेटवर लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
यंदाच्या बजेटचं वर्णन “जुनं सामान नव्या डब्यात नव्या लेबलसह देण्यासारखं” असं केलं आहे. रोहिणी आचार्य यांनी ‘एक्स’वर लिहिलं की, “अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दरडोई उत्पन्नात वाढ कशी होईल? यावर बजेटमध्ये कोणतीही स्पष्टता नाही. डिजिटल कंटेंट क्रिएशनला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलले गेले आहे, परंतु देशातील सुशिक्षित आणि अशिक्षित तरुण लोकसंख्येसाठी प्रत्यक्षात जॉब-क्रिएशन कसं आणि कोणत्या क्षेत्रांत होईल? देशाच्या या सर्वात गंभीर विषयावर बजेटमध्ये कोणताही स्पष्ट रोडमॅप नाही.”
रोहिणी आचार्य यांनी पुढे लिहिलं, “बिहारसाठी पूर व्यवस्थापन, पूर रोखणं, पूरानंतरचे पुनर्वसन आणि सिंचन संसाधनांची निर्मिती व विकासासाठी ‘विशेष पॅकेज’ देण्याची अत्यंत महत्त्वाची आणि जुनी मागणी आहे. मात्र त्यासाठी कोणतीही बजेटमध्ये तरतूद नसणं हे निराशाजनक आहे.”
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ वर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांचे आभार मानतो, ज्यांनी २०४७ चा भारत कसा असेल, याबद्दल ३ कर्तव्यांची माहिती दिली. या बजेटमध्ये अनेक योजना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये हाय-स्पीड रेल, इन्फ्रास्ट्रक्चर, मत्स्यपालन आणि जलमार्ग प्रकल्पांवर चर्चा करण्यात आली आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…