शरद पवारांचा दोन्ही NCP एकत्र येण्यास हिरवा कंदील; अजित पवारांनी घेतल्या होत्या 14 निर्णायक बैठका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनं राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
मनपा निवडणुकीपासूनच अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांना वाव मिळाला होता, किंबहुना एकत्रिकरणाची अधिकृत घोषणाच बाकी होती, असं सुचवणारी माहिती नुकतीच विश्वसनीय सूत्रांमार्फत समोर आल्यानं आता पडद्यामागं घडलेल्या या घडामोडींनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं आहे.
अजित पवारांनी घेतल्या होत्या 14 बैठका?
सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी अजित पवारांनी 14 निर्णायक बैठका घेतल्या होत्या. दरम्यान, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची शेवटची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणण्यावर अंतिम सहमती होती.
पुढे नेमकं काय काय घडलं?
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या अंतिम बैठकीनंतर अजित पवारांची शरद पवारांशी थेट भेट झाली. जिथं शरद पवारांनीही दोन्ही पक्ष एकत्र येण्यास हिरवा कंदील दाखवला. जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकत्रिकरण जाहीर करण्याचा निर्णयही झाला. म्हणूनच उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदरील संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्याची माहिती असून, शरद पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून एकत्रीकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी एकत्र येण्यावर भर दिला.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीची खाती आणि मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चाही सुरू झाली आहे. याप्रकरणी मोठ्या घाडमोडी घडत आहेत. ज्या धर्तीवर राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे शुक्रवार 30 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. या बैठकीत राष्ट्रवादीकडील खात्यांबाबतही चर्चेची तसंच उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..