‘महापौर आमचाच’वर भाजपा ठाम! शिंदेंना स्वीकारावीच लागणार ‘ही’ ऑफर; सेनेच्या वाट्याला ‘हे’ पद?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भारतच नाही तर आशियामधील सर्वात मोठी महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासंदर्भात कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतल्याने आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेला उपमहापौरपदावरच समाधान मानावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.
गेली 25 वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असे गणित होते, ते यंदा पहिल्यांदाच बदलण्याची शक्यता असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
शिंदेंच्या शिवसेनेची ती मागणी अमान्य
महापालिकेत यंदा प्रथमच भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, महापौरपदावर भाजप ठाम आहे. शिंदेसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महापौरपद द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती; पण, भाजपकडून ही मागणी मान्य करण्यात आलेली नसल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. परिणामी, शिंदेसेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार असल्याचे चिन्ह आहे. मुंबईचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असणार आहे. या आरक्षणाची सोडत गुरुवारी जाहीर झाली.
शनिवारी होणार महत्त्वाची बैठक
महापौरपदासाठी आम्ही आजही आग्रही आहोत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी बैठक होऊन अंतिम निर्णय होईल. पण, महापौरपद नाहीच मिळाले तर उपमहापौरपद घेऊ, असे शिंदेसेनेच्या एका नेत्याने ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलताना स्पष्ट केले. मात्र जागांमधील तफावत पाहता भाजपा शिंदेंच्या शिवसेनेसमोर कोणत्याही पद्धतीने नमतं घेणार नाही. भाजपा निकालापासूनच आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी कधीही महापौरपदावरील दावा सोडलेला नाही.
संभाव्य उमेदवार कोण?
शिंदेसेनेकडून उपहामपौरपदासाठी नावांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. त्यातही शिंदे सेनेकडून उपमहापौरपदाबरोबरच स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कोणाला पाठवावं याबद्दलचाही विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. उपमहापौरपदासाठी समृद्धी काते, शैला लांडे, अश्विनी माटेकर यांची नावे चर्चेत आहेत. तर स्थायी समिती, शिक्षण समितीसाठी तृष्णा विश्वासराव, संध्या दोषी, अंजली नाईक यांच्यासारख्या आक्रमक नगरसेविकांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
मुंबईतील संख्याबळाची स्थिती काय?
भारतीय जनता पक्ष (BJP): 89 जागा (सर्वात मोठा पक्ष)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे – UBT): 65 जागा (एका बंडखोरीमुळे संख्या 64 वर)
शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 29 जागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress): 24 जागा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS): 6 जागा
एआयएमआयएम (AIMIM) – 8 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 3 जागा
समाजवादी पक्ष (SP)- 2 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 1 जागा
मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी एकूण 227 पैकी 114 जागांची गरज आहे. भाजपा आणि शिंदेंच्या सेनेची एकूण नगरसेवक संख्या 118 इतकी होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..