सरकारी निधीतून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा फंडा; विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘लाडक्या बहिणींच्या बटव्यातून पाच हजार काढत.’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- “सरकारी निधीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा फंडा आहे. महागाई वाढवून लाडक्या बहिणींच्या बटव्यातून पाच हजार काढत शासकीय तिजोरीतून त्यांच्या खात्यात दीड हजार टाकले जातात.
हे भाजपचे पाप आहे, अशी टीका काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.
अकोला महापालिका निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ ते आज आले होते. माध्यमांशी संवाद साधतांना विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध असल्याच्या भाजपच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘सत्ताधारी एका दिवसातून लाडक्या बहिणींचे पाच हजार रुपये लुटून नेत आहेत. ५० रुपये किलोचे तेल १५० रुपये केले. ४० रुपये किलो मिळणारी दाळ आता १२० रुपये झाली. गृहिणींचे संपूर्ण बजेटच कोलमडून टाकण्याचे पाप भाजप करीत आहे. सरकारी तिजोरीतून दीड हजार रुपये वाटून लूट करण्याचे काम केले जात असून त्याला लाडकी बहीण हे नाव देण्यात आले. लाडकी बहीण आता भुलणार नाही. महागाई वाढवून सत्ताधारी त्यांची लूट करतात, हे आता लपून राहिलेले नाही.’
आमच्या एका उमेदवाराने असे म्हटले की १४ तारखेला तुम्ही पैसे का टाकताय? १५ ला मतदान आहे. सरकारी निधीचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा फंडा आहे. पैसेच टाकायचे होते, तर ते अगोदर टाकायला पाहिजे किंवा नंतर करायला पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर हे करणे म्हणजे त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल. आम्ही त्याला विरोध केलेला नाही. शब्द फिरवण्यात भाजप हुशार आहे. जनतेला सर्व माहिती आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. यावेळी काँग्रेस नेते प्रकाश तायडे, प्रदीप वखारिया, महानगराध्यक्ष प्रशांत वानखडे आदी उपस्थित होते.
‘भाजप आयत्या बिळावर नागोबा’
महाराष्ट्रावर १० लाख कोटींचे कर्ज उभे केले. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री केवळ स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करत राज्याची तिजोरी लुटत आहेत. निवडणुका आल्या की वेगळे लढतात. अजित पवारांना केवळ काँग्रेसची मते खाण्यासाठी बाजूला ठेवले. जे जातीय आणि धर्मांध शक्तींसोबत जाऊन बसतात, ते धर्मनिरपेक्ष कसे असू शकतात? ७० वर्षांत काँग्रेसनेच देश उभा केला. आयत्या बिळावर नागोबा सारखे हे लोक येऊन बसले आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..