शेतकरी दाम्पत्यावर वीज कोसळली ; पती ठार तर पत्नीची प्रकृती चिंताजनक ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुक्यातील फुलसावंगी परिसरात असलेल्या चिल्ली शिवारातील शेतात दामपत्यांवर वीज कोसळल्याने पती जागीच ठार झाला असून पत्नी चिंताजनक आहे. ही घटना दुपारी आज (ता.०३) साडेतीनच्या सुमारास घडली. विलास भुमा राठोड(५०) असे मृतक पती शेतकऱ्यांचे नाव असून पत्नी ललीताबाई भुमा राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मृतक विलास भुमा राठोड
प्राप्त माहितीनुसार ,
विलास भुमा राठोड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या नावावर २ एकर शेती आहे.दुपारच्या सुमारास विजेचा कडकडाटसह पावसाच्या दमदार सरी कोसळल्या.दाम्पत्य शेतात निंदन करत असताना अचानक वीज दामप्त्यावर कोसळली.त्यात पती विलास राठोड हे मृत्यूमुखी पडले.तर पत्नी ललीताबाई बेशुद्ध पडली .

जखमी ललीताबाई विलास राठोड
घटनेची वार्ता कळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख किसन धनु जाधव यांनी जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांना घटनेबाबत दूरध्वनीवरून माहिती दिली . मनीष जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या आहे. लालीताबाई यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पिडीत कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मनीष जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….