‘वंचित’कडून उमेदवारांची पहिली यादी, महापालिका निवडणुकीत आघाडीवर मात्र अनिश्चिततेचे सावट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महापालिका निवडणुकीसाठी वंचित आघाडीची राज्यातील पहिली यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. अकोला महापालिकेसाठी वंचितने पाच उमेदवारांची नावे पहिल्या यादीत घोषित केले. काँग्रेस व इतर पक्षांसोबत आघाडी करण्यावर अनिश्चिततेचे सावट कायम आहे.
भाजप वगळता इतर पक्षांशी आघाडी करण्यासाठी तयार आहोत. मात्र, कुठल्याही पक्षाकडून योग्य प्रस्तावच आला नसल्याची माहिती वंचित आघाडीचे जिल्हा प्रभारी नातिकोद्दिन खतीब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुकांसह राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. युती व आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. काँग्रेस व वंचित आघाडी एकत्रित येणार असल्याची चर्चा असतांनाच आज वंचित आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पुढचे पाऊल टाकले. आता जाहीर केलेल्या जागा वगळून आघाडी करण्याचे दारे अद्यापही वंचित आघाडीने उघडे ठेवले आहेत.
राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आज पक्षाने ही यादी जाहीर केली. महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दोन प्रभागातील पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक सात अ मध्ये किरण महेंद्र डोंगरे, ड मध्ये महेंद्र देविदास डोंगरे, तर प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये चंदू सिरसाट, ब मध्ये नाज परवीन शेख वसीम व क मध्ये शमीम परविन कलीम खान पठाण यांना उमेदवारी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावेळी अकोला पूर्व महानगराध्यक्ष नीलेश देव, सल्लागार बालमुकूंद भिरड, गजानन गवई, पराग गवई आदी उपस्थित होते.
काँग्रेसकडून अधिकृत प्रस्तावच नाही
भाजपवगळता इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी वंचित तयार असल्याचे या अगोदरच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसच्या जिल्हा किंवा प्रदेशवरून कोणताही अधिकृत प्रस्ताव आघाडीसाठी वंचितकडे आला नाही, असे जिल्हा प्रभारी नातिकोद्दिन खतीब यांनी सांगितले. स्वबळावर निवडणूक लढण्याची पक्षाची पूर्ण तयारी आहे. पक्षाकडे ८० जागांसाठीही उमेदवार तयार आहेत. उमेदवारीसाठी पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखणे ही पक्षाची प्राथमिकता आहे. कार्यकर्त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे देखील गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पहिली यादी जाहीर झाली. आघाडी संदर्भात काही प्रस्ताव आल्यास अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर घेतली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….