निवडणूक जाहीर मात्र अद्याप महापौर पदाचे आरक्षण नाहीच..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अद्याप काढलेली नाही.
राज्यभर अशीच परिस्थिती आहे. प्रथमच अशी घटना घडत आहे.
याचा परिणाम काही प्रमाणात निवडणुकीच्या वातावरणावर झाला आहे. यापूर्वी महापौर पदाचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर केले जात असे. त्यानुसार या पदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार निवडूंच येण्यासाठी रस्सीखेच करत, सढळ हाताने खर्च करत. महापौरपद मिळवण्याची इर्षा त्यामागे असे. आता महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे हेच माहीत नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम आहे.
यापूर्वी महापालिकेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी किंवा महापौर पदाची निवडणूक होण्यापूर्वी साधारण दीड ते दोन वर्ष आधीच नगरविकास विभागाकडून आगामी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जात असे. राज्यातील महापालिकांच्या महापौरपदाची सोडत एकत्रितच मुंबईत काढली जात असे. यंदा मात्र निवडणूक जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली नाही.
या आरक्षण सोडतीसाठी नगर विकास विभागाने राज्यातील महापालिकांकडून वारंवार माहिती मागवली. परंतु प्रत्यक्षात सोडत काढली गेलीच नाही. अहिल्यानगर महापालिकेची स्थापना जून २००३ मध्ये झाल्यानंतर डिसेंबर २००३ मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या ५ महिने आधी म्हणजे ५ ऑगस्ट २००३ रोजी शहराच्या पहिल्या महापौर पदाचे आरक्षण सोडती द्वारे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित करण्यात आले होते. त्यानुसार शिवसेनेचे (एकत्रित) भगवान फुलसौंदर हे या प्रवर्गातून प्रथम महापौर झाले.
महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असल्याने दुसऱ्या महापौर पदासाठी सन २००५ मध्येच आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीच्या सुमारे दीड ते दोन वर्ष आधीच महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाली आहे, याकडे लक्ष ठेवत इच्छुक मोर्चेबांधणी करत असतात. मात्र महापौर पदाचे आरक्षण माहिती नसल्यामुळे मोर्चेबांधणीला लगाम बसला, पर्यायाने खर्चालाही लगाम बसला आहे.
महापौर पदाचे आजपर्यंतचे आरक्षण
१) १ जानेवारी २००४ ते ३० जून २००६ भगवान फुलसौंदर (शिवसेना- नागरिकांचा मागास प्रवर्ग)
२) १ जुलै २००६ ते ३१ डिसेंबरचे २००८ संदीप कोतकर (काँग्रेस-ला खुला प्रवर्ग)
३) १ जानेवारी २००९ ते ३० जून २०११ संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस- नागरिकांचा मागास प्रवर्ग)
४) १ जुलै २०११ ते ३१ डिसेंबर २०१३ शीला शिंदे (शिवसेना- महिला प्रवर्ग)
५) १ जानेवारी २०१४ ते ३० जून २०१६ -खुला प्रवर्ग (१ जानेवारी २०१४ ते २७ मे २०१५- संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस व ८ जून २०१५ ते ३० जून २०१६- अभिषेक कळमकर, राष्ट्रवादी)
६) १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८- सुरेखा कदम (शिवसेना- महिला प्रवर्ग)
७) १ जानेवारी २०१९ ते ३० जून २०१९- बाबासाहेब वाकळे (भाजप- खुला प्रवर्ग)
८) १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३- रोहिणी शेंडगे (शिवसेना- अनुसूचित जाती महिला प्रवर्ग)

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….