राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारतीय जनता पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपने नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केली आहे. बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांची पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जे पी नड्डा यांचा अध्यक्षपादाचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर आता नितीन नवीन हे पक्षाच्या जबाबदाऱ्या स्वीकारतील. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळं आता भाजपला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. भाजप अध्यक्ष हे संविधानिक किंवा सरकारी पद नाही. त्यामुळे त्यांना सरकारकडून कोणतेही वेतन दिले जात नाही. त्याऐवजी पक्ष स्वतः आपल्या निधीतून पगार आणि इतर सुविधा देतो.
नितीन नबीन हे एक तरुण नेते, त्यांना समृद्ध संघटनात्मक अनुभव आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. नितीन नबीन यांनी स्वतःला एक मेहनती भाजप कार्यकर्ता म्हणून स्थापित केले आहे. ते एक तरुण, समर्पित आणि संघटनात्मकदृष्ट्या अनुभवी नेते आहेत. ज्यांचा बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून अनेक कार्यकाळात प्रभावी कामगिरी आहे. त्यांनी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि वचनबद्धतेने काम केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी होते?
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद हे पक्षाच्या संविधानानुसार दिलेल्या प्रक्रियेद्वारे निवडले जाते. ही प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:
पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया
प्रत्येक राज्यात राज्य कार्यकारिणी तयार केली जाते.
त्या कार्यकारिणीतून राष्ट्रीय प्रतिनिधी निवडले जातात.
हे राष्ट्रीय प्रतिनिधी पुढे राष्ट्रीय कार्यकारिणीत सहभागी होतात.
राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही या राष्ट्रीय प्रतिनिधींच्या मतांवरून होते.
निवडणूक अधिकारी
निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी नेमला जातो.
अर्ज, नामनिर्देशन, मतमोजणी ही प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली पार पडते.
सहसा एकमुखी निवड
बहुतेक वेळा पक्षांतर्गत एकता आणि सहमतीच्या आधारे एकमेव उमेदवाराच्या नावावर एकमुखी निवड होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाची गरज पडत नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….