दिल्लीतील वादग्रस्त घोषणा भाजप कार्यकर्त्यांचाच कृत्य; नाना पटोले यांचा गंभीर आरोप; म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दिल्लीतील ‘व्होट चोर, गद्दी छोड’ या आंदोलनात लागलेले वादग्रस्त घोषणा भाजपच्याच कार्यकर्त्यांनी दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
अशा पद्धतीने कट करून स्वतःला शिव्या घालून घेऊन राजकारण “नॉन बायोलॉजिकल माणूस” असलेले नरेंद्र मोदीच करून घेऊ शकतात, अशी बोचरी टीकाही पटोले यांनी केली. यापूर्वी बिहारमध्येही राहुल गांधीच्या सभेतून मोदींच्या आईला अपशब्द काढणारा माणूस भाजपशी संबंधित होता, हे नंतर लक्षात आले होते. दिल्लीच्या मोर्चामध्ये ही तशाच पद्धतीने घोषणा देऊन राजकारण घडवले जात असल्याचा आरोप काँग्रेसनेतेनाना पटोले यांनी केलाय. आमची मोदीविरोधातली घोषणा म्हणजे “वोट चोर गद्दी छोड” हीच आहे आणि हीच घोषणा कायम राहील असेही पटोले म्हणाले.
दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य रॅलीचे आयोजन
दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून व्होट चोरीच्या मुद्द्यावर आज (14 डिसेंबर) भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानावरील या जनसभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित आहेत. निवडणूक हेराफेरी आणि मतचोरीच्या विरोधात काँग्रेसकडून मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोठी रॅली होणार आहे. या रॅलीद्वारे काँग्रेस मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या रॅलीला संबोधित करतील. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश आणि सचिन पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते देखील व्यासपीठावर उपस्थित राहतील. माजी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी देखील या रॅलीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
“व्होट चोर, गद्दी छोड” ही घोषणा
काँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले की, निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नसल्याने “व्होट चोर गद्दी छोड” ही घोषणा देऊन ही रॅली आयोजित केली जात आहे. दरम्यान, भूपेश बघेल यांनी आरोप केला की भाजप आणि निवडणूक आयोग एकत्रितपणे लोकशाही कमकुवत करत आहेत. काँग्रेस नेते उदित राज यांनी या रॅलीचे वर्णन एक जनआंदोलन म्हणून केले आणि म्हटले की हा केवळ पक्षाचा कार्यक्रम नाही तर लोकांच्या हक्कांचे आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठीचा लढा आहे. त्यांनी सामान्य नागरिकांनाही या रॅलीत सामील होण्याचे आवाहन केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….