उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका, “गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस अधिवेशनात होते. त्यावेळी त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख अॅनाकोंडा असा केला होता. ज्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती.
अमित शाह यांनी कलम ३७० रद्द करुन दाखवलं. ते बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांच्याबाबत असं बोलताना लाज वाटली पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी उद्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांनी त्यांचा उल्लेख गुलाम आणि गांडुळ असा केला आहे.
काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
ज्यांनी हिंदुत्व सोडलं, सत्ता आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले पण त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकताही नाही. मी एवढंच सांगेन अमित शाह यांच्यावर आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संघटना आहे. देशावर संकट आलं तेव्हा त्याची प्रचिती आली आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ३७० कलम रद्द करणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते अमित शाह यांनी केलं. त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई ज्यांनी अनेक वर्षे लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोव्हिड काळात रुग्णांच्या खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातलं डांबर खाल्लं, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा लोकांनी अमित शाह यांच्याबाबत बोलणं ही शोकांतिका आहे. त्यांचा बॅलन्स गेलेला दिसतो आहे. त्यामुळे ते काहीतरी असंबद्ध बडबड करत आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांना पांघरुण मंत्री म्हणता आहात त्यांनाच बुके घेऊन भेटायला कशाला जाता? ही उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका आहे. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि पदासाठी ज्यांनी स्वतःचं पायपुसणं करुन घेतलं त्यांना देवेंद्र फडणवीसांवर टीका करायचा अधिकार आहे का? असं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता काय टीका केली?
मी त्यांना (अमित शाह) अॅनाकोंडा म्हटल्यानंतर उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे की नको? अॅनाकोंडाने उत्तर देण्याऐवजी गांडुळाची अवलाद उत्तर देते आहे. गांडूळ कोण तुम्हाला माहीत आहे. मला परवा कुणीतरी प्रश्न विचारला त्यावेळी मी त्यांना सांगितलं गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते, तू गुलाम आहेस. तुला जे सांगितलं ते कर. बिस्किटाचे दोन तुकडे फेकतील ते खा आणि पडून राहा. कारण गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढायचा नसतो. गांडुळाला फणा काढताना तुम्ही पाहिलंय का? त्याचा कुठला भाग वर येतोय म्हणजे तोंड येतंय की शेपूट ते कळणारच नाही. त्यालाही कळत नाही, लोकांनाही कळत नाही. पण त्यांना लक्षात येत नाही, त्यांना हाताशी धरुन हे भाजपाचे लोक मुंबईचं मराठीपण मारत आहेत त्याची हत्या करत आहेत. आपल्या गद्दारांना वापरत आहेत आणि ते त्या गद्दारांना कळत नाही. महाराष्ट्र धर्म मारण्याचं काम हे करत आहेत. मुंबई काय गुजरात आणि अदाणींच्या चरणी वाहून टाकणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….