उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, ‘आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा.’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईतील वरळी डोममध्ये काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा निर्धार मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा ‘अॅनाकोंडा’ असा उल्लेख केला होता.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘अॅनाकोंडा’ असा उल्लेख केला आहे.’आपली मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय’, असं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“आता त्यांना (अमित शाह) अॅनाकोंडा म्हटल्यानंतर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे की नको? अॅनाकोंडाने उत्तर द्यायला पाहिजे ना, पण अॅनाकोंडाने उत्तर देण्याऐवजी गांडुळाची अवलाद उत्तर देते. मग आता गांडुळ कोण? मला कोणीतरी परवा प्रश्न विचारला होता. मला काय माहिती? गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते. गुलाम आहेस रे तू. तुला जे काही काम सांगितलं ते काम कर. दोन बिस्किटाचे तुकडे फेकले जातील तेवढे खा आणि गप पडून राहा. गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळाने फणा काढायचा नसतो. गांडूळ कधी फणा काढताना तुम्ही पाहिलं का?”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
“यांना (शिंदेंना) एक कळत नाही की त्यांना हाताशी धरून हे मुंबईचं मराठीपण मारत आहेत आणि त्यासाठी लागणारे हत्यार म्हणून आपल्या गद्दारांना वापरत आहेत. हे त्या गद्दारांना कळत नाही. आपलीच हत्यारं आपल्यावर चालवत आहेत. आपलीच माणसं आपल्यावर सोडत आहेत आणि मुंबईचं मराठीपण मारून टाकत आहेत. महाराष्ट्र धर्म मारून टाकत आहेत. मग मुंबई तुम्ही गुजरातच्या चरणी वाहून टाकणार आहात का? तुम्ही मुंबई अदानीच्या चरणी वाहून टाकणार का? हा विषय फक्त मुंबईतील कोळीवाड्याचा नाही तर संपूर्ण मुंबईचा हा विषय आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“आज देखील त्यांनी मोठ्या घोषणा केल्या असतील. करायलाच पाहिजेत कारण आता निवडणुका लागतील. मुंबईचा कोस्टल रोड आपण केलेला आहे. संपूर्ण कोस्टल रोड हा आपण मुंबई महापालिकेच्या पैशातून केलेला आहे. मला आजही आठवतं जेव्हा आपण कोस्टल रोड शिवसेनेचं वचन म्हणून जाहीर करणार होतो, तेव्हा मी शिवसेना प्रमुखांची परवानगी घ्यायला गेलो होतो, तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की त्यामुळे जी जागा रिकामी होईल त्या जागेवर बिल्डर्सचा डोळा पडता कामा नये. तेव्हा मी वचन दिलं होतं, ते आपण आर्ध पूर्ण करून दाखवलं. पण आर्ध अद्याप बाकी आहे”,असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“आता जर मुंबई महापालिका त्यांच्या घशात गेली तर कोस्टल रोडच्या आजूबाजूला मोकळी होणारी जागा हे बिल्डरांच्या घशात घालतील. जिकेड गेलो तिकडे चांदा ते बांधा अदानी, कोण आहे हा माणूस? हा व्यक्ती काय ब्रम्हराक्षस झाला आहे का? सगळं काही त्या अदानीकडे देत आहेत. मग आमच्या सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? मुंबईचा डंपिंग ग्राउंड अदानीला, धारावी अदानीला, कुर्ला मदर डेअरी अदानीला, मिठागरे अदानीला, म्हणजे हे काय आहे? ही मुंबई आहे की मुंबईची अदानी नगरी करायची का? आता ही कसोटी माझी नाही, तुमच्या सर्वांची आहे. आपल्या हक्काची मुंबई आहे, मग आपण आपली मुंबई आपल्या हातात ठेवणार की त्यांच्या चरणी वाहून देणार? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….