राहुल गांधींची अमित शाह यांच्यावर टीका; “मी प्रश्न विचारताच संसदेत अमित शाह थरथर कापत होते, आणि.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या रामलीला मैदानात वोट चोर गद्दी छोड नावाची रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी, मनिष तिवारी यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश होता.
या रॅलीत बोलत असताना राहुल गांधींनी भाजपावर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही राहुल गांधींनी टीका केली.
काय म्हणाले राहुल गांधी ?
राहुल गांधी म्हणाले, “सधया देशामध्ये खरा संघर्ष जर कुठला सुरु असेल तर तो सत्य आणि असत्य यांच्यातला संघर्ष आहे. मी भाषण करणार होतो आणि ते ठरलेलं भाषण होतं. मात्र मला कळलं की अंदमान निकोबार या ठिकाणी मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते वक्तव्य ऐकल्यानंतर मी माझं भाषण बदललं.”
सत्य हा आपल्या विचारांचा आधार आहे तर सत्ता हा संघाचा विचार आहे
राहुल गांधी म्हणाले, भारताची संस्कृती आणि सगळे धर्म यांचा पाया सत्यावर टिकलेली आहे. सत्यम शिवम सुंदरम हे आपल्या देशातील धर्मांचं मूळ आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा या विचाराच्या अगदी उलट आहे. मोहन भागवत यांच्या विचारधारेत सत्याला काहीही स्थान नाही. त्यांना फक्त ताकद आणि सत्ता याच गोष्टी सर्वोच्च वाटतात. अशी टीका राहुल गांधींनी केली.
मी प्रश्न उपस्थित केले तेव्हा अमित शाह यांचे हात थरथर कापत होते-राहुल गांधी
व्होट चोरीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले मी जे काही प्रश्न उपस्थित केले त्याची अमित शाह यांच्याकडे काहीही उत्तरं नाहीत. मी प्रेझेंटेशनमध्ये काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी उत्तर देताना अमित शाह यांचे हात थरथर करत होते अशी टीका राहुल गांधींनी केली.
भाजपाकडे सत्ता आहे आणि आपल्याकडे सत्य आहे-राहुल गांधी
राहुल गांधींनी म्हटलं आहे आजची देशातली लढाई सत्य विरुद्ध सत्ता अशी आहे. त्यांच्याकडे (भाजपा) सत्ता आहे, ताकद आहे आणि आमच्याकडे सत्य आहे. मी आज तुम्हाला खात्रीने सांगतो आहेत की सत्यासोबत उभं राहून आपण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची म्हणजेच आरएसएस भाजपाची सत्ता हटवू. आपल्या भाषणात राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष संस्था म्हणून काम करत नाही. सरकारच्या बाजूने निर्णय घेण्याचं काम निवडणूक आयोग करतो आहे. निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत ते देखील सत्तेच्या बाजूने आहेत सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असाही आरोप राहुल गांधींनी केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….