मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या अधिवेशनातील भाषण हिवाळी अधिवेशनातही वाचून दाखवले; विरोधक म्हणतात, ‘केवळ घोषणांचा.’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “विदर्भात होणारे अधिवेशन किमान तीन आठवडे चालावे अशी विरोधकांची इच्छा होती. मात्र, सरकारने केवळ सात दिवसांमध्ये अधिवेशन संपवले.
पहिल्या दोन दिवसांत ७५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्यावर मंत्री आणि सत्ताधारी आमदारांसाठी अधिवेशनाचे गांभीर्यच संपले होते.
त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुरवणी मागण्या मान्य करून घेत केवळ सरकारी तिजोरीवरील मलीदा खाण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी अधिवेशनाचे सुप वाजल्यावर विरोधकांच्या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे गटनेते भाष्कर जाधव, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये झालेल्या जुन्याच अधिवेशनातील भाषण वाचून दाखवले. यात केवळ नेहमीप्रमाणे घोषणांचा पाऊस होता, निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी अधिवेशन झाले, असेही ते म्हणाले.
सरकारकडून ज्या काही घोषणा झाल्या त्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासाठी झाल्या पण विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक करणारे हे अधिवेशन होते अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे अधिवेशन झाले.
सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले यांबाबत प्रश्न विचारूनही सरकारने कारवाई केली नाही अशी टीका सचिन अहिर यांनी केली.
विदर्भातील जनतेला वाटाण्याच्या अक्षता : वडेट्टीवार
विदर्भातील धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता. धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारने कारवाई केली नाही. राज्यातील तरुणांना ड्रगचा विळखा आहे. पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस – सतेज पाटील
विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील म्हणाले की, या अधिवेशनात घोषणांचा नुसता पाऊस पडला. कापूस खरेदीचे केंद्र वाढवा ही मागणी केली पण त्याचा ही निर्णय झाला नाही. पैसे नाही खिशात पण घोषणा मात्र अपार अशी अवस्था महायुती सरकारची आहे. या सरकारने इतक्या घोषणा केल्या की, त्यासाठी संपूर्ण अर्थसंकल्पही कमी पडेल अशी अवस्था आहे, अशी टीका पाटील यांनी केली.
विरोधकांच्या प्रश्नांपासून पळ काढला : जयंत पाटील
मुख्यमंत्र्यांनी राज्यात गुंतवणूक येते, करार झाले याबाबत सभागृहाला माहिती दिली. पण ज्यांच्याबरोबर करार झाले त्या कंपन्या राज्यात येत नाही. प्रत्यक्षात गुंतवणूकच झालेली नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न उपस्थित केले त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….