देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत असं मी म्हणणार नाही पण.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे. २०२९ ते २०३० दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, याबद्दल मला विश्वास आहे. आपल्या तिजोरीत खूप पैसे नसले तरी आज घडीला महाराष्ट्र सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
रविवारी हिवाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे सर्व आरोप फेटाळत लावत राज्याची अर्थव्यवस्था सुदृढ असल्याचा दावा केला.
महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट आपण तयार केलं आहे-फडणवीस
आपण महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे. त्यामध्ये २०४७ चा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोडमॅप आपण तयार केला आहे. २०३० चा पहिला टप्पा, २०३५ चा दुसरा टप्पा आणि २०४७ चा तिसरा टप्पा आहे. मला विश्वास आहे की, २०२९ ते २०३० दरम्यान महाराष्ट्र हा देशातील पहिली एक ट्रिलिनय डॉलर्सची अर्थव्यवस्था असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत असं मी म्हणणार नाही पण…
आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, असे मी म्हणणार नाही. पण मी एवढं निश्चित सांगतो, देशातील मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. राज्यातील विकासासाठी कर्ज उभारावे लागते. प्रत्येक राज्य ते कर्ज उभारते. त्यामध्ये रिर्झव्ह बँकेने आणि एफआरबीएमने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या २५ टक्के कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. त्याच्यावर आपण गेलो तर अर्थव्यवस्था अडचणीत आली, असा त्याचा अर्थ होतो. आपण २०२५-२०२६ चे अर्थसंकल्पीय अंदाज आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या १८.८७ टक्के एवढे कर्ज घेतले आहे. २५ टक्क्याच्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. देशात अशी फक्त तीन राज्यं आहे, ज्यांचं हे दायित्व २० टक्क्यांपेक्षा कमी आहे, यामध्ये गुजरात, महाराष्ट्र आणि ओरिसा यांचा समावेश आहे, हे सांगताना मला आनंद होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे पैसे देऊनही…
राजकोशीय वित्तीय तूट ही तीन टक्क्याच्या आत असणे गरजेचे आहे. आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे पैसे देऊनही आपली वित्तीय तूट तीन टक्क्याच्या आतच आहे. सरत्या वर्षात आपण वित्तीय तूट २.७६ टक्के इतकी मर्यादित ठेवली. या निकषातही आपली अर्थव्यवस्था कुठेही दिवाळखोरीकडे निघाली नाही. महसुली जमेशी व्याजाच्या प्रदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी आपण जर बघितली ती ११.५३ टक्के आहे. पण गेल्या वर्षीच्या नोंदीनुसार ती ११.३५ टक्के इतकी आहे. केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक महाराष्ट्र सरकारने केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….