मुख्यमंत्र्यांची दिलगिरी, काय घडले…? दिवसभर चर्चा ‘या’ बहिष्कारास्राची….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “नागपूर येथे सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. यंदा ते एक आठवड्याचेच आहे. पण ते नेहमीच वादळी होते. विदर्भासाठी हे अधिवेशन घेण्याचे प्रयोजन आहे, पण विदर्भातील प्रश्नवर चर्चा कमी आणि इतर मुद्यांवरच अधिक होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधाकांची भूमिका दिसून आली. विरोधकांनी नेहमी प्रमाणे सरकारचा निषेध करीत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. मात्र यावेळी विरोधकांपेक्षा चर्चा होती वेगळ्याच बहिष्कार अस्त्राची.
विधिमंडळाचे कोणतेही अधिवेशन असो, त्याच्या पूर्वसंध्येला सरकारच्या निषेधार्थ विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार ठरलेला. नागपूर हिवाळी अधिवेशनाची ही परंपराच झाली. यंदाही ती कायम आहे, मात्र यावेळी मुंबईहून नागपूरला अधिवेशनाचे वृत्तसंकलन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांनीच सरकारच्या धोरणाविरुद्ध बहिष्कारास्त्र उगारले. सरकारने मध्यस्थी केल्यानंतर ते मागे घेण्यात आले. पण त्याची चर्चा रंगली.
झाले असे की, दरवर्षी मुंबईचे पत्रकार विधिमंडळ कामकाजाच्या वृत्तसंकलनासाठी नागपूरला येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था ‘सुयोग’ येथे केली जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. यंदा मात्र सरकारने याबाबत काही जाचक नियम तयार केले. एका वर्तमानपत्राचा एकच प्रतिनिधी असावा यासह इतर काही अटी त्यात होत्या. एकीकडे पत्रकारांसाठी नियमावली लागू करतानाच दुसरीकडे माध्यमांशी संबंध नसलेल्यांनी यात घुसखोरी केल्याचा पत्रकार संघटनांचा दावा होता. याला विरोध म्हणून पत्रकार संघटनानी दुपारच्या भोजनावर आणि संध्याकाळच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील भोजनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याची माहिती सरकारपर्यंत पोहचली, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पत्रकारांची नाराजी योग्य नव्हे म्हणून सरकारी पातळीवरून तातडीने दखल घेण्यात आली.
सभापती, विधिमंडळाच्या सचिवांसोबत पत्रकार संघटनाच्या प्रतिनिधी चर्चा झाली, जाचक अटी असणारी नियमावली मागे घेण्याचे ठरले. त्यानंतर पत्रकारांनी समोपचाराची भूमिका घेत बहिष्कारास्त्र मागे घेतले. संध्याकाळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारापेक्षा पत्रकारांच्या बहिष्काराचीच चर्चा दिवसभर होती. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात केलेल्या उल्लेखांनी ती अधिक वाढली. पत्रकारांमध्ये असलेले गट-तट यानिमित्ताने उघड झाले. नागपूरचे अधिवेशनच अशाच काही तरी वेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. यंदा गैरराजकीय बाबींनी ते पहिल्याच दिवशी चर्चेत आले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….