‘शेकोटी करायची वेळ झाली’; राज्यभरात थंडीचा कडाका, मुंबई 13 अंशावर तर इतर जिल्ह्यात…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईतून गायब झालेली थंडी पुन्हा पडायला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. यानंतर थंड वारे दक्षिणेच्या दिशेने वाहण्यास सुरुवात होईल. परिमाणी महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून सोमवारपासून महाराष्ट्रात शीत लहरींचा परिणाम दिसायला लागेल. १०, ११ आणि १२ डिसेंबर या तीन दिवशी राज्यातील किमान तापमानाचा पारा खाली येईल. याशिवाय रविवार ७ डिसेंबरपासूनच पारा घसरायला सुरुवात होईल अशी माहिती आहे., यावेळी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात सर्वत्र थंडी जास्त असेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात थंडीत वाढ…
धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमान काही अंशांनी घसरलं असून थंडीत वाढ झाली आहे. हवामान विभागानुसार किमान तापमान १७ ते १८ अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान २८ अंशांवर स्थिरावू शकते. ढगाळ हवामान येत्या काही दिवस कायम राहण्याचा अंदाज असून, या बदलाचा थेट परिणाम जिल्ह्यातील पिकांवर होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे हवामान ज्वारीसाठी फायदेशीर ठरणार असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याच वातावरणाचा हरभऱ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे. हरभरा पिकात रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्ध्यात पारा घसरला, तापमान 11.2 अंशावर
वर्ध्यात मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात घट होऊ लागल्याने पारा ११.२ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. तापमानात सातत्याने होत असलेली घट मुळे आणखी थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. थंडीत वाढ होऊ लागल्याने नागरिक शेकोटीचा सहारा घेतांना दिसून येत आहे, सोबतच वाढत्या थंडीमुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहेय.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….