सत्तेसाठी हापापल्या “उमा”ने पक्ष टांगला वेशीवर ; ताई ऐवजी केली भाऊशी हात मिळवली…
सत्तेसाठी हापापल्या “उमा”ने पक्ष टांगला वेशीवर ; ताई ऐवजी केली भाऊशी हात मिळवली…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रितेश पुरोहित
पुसद :- “शिवसेना पक्षामध्ये कार्यशून्य असलेल्या “उमा”ने आता आपला मोर्चा स्व वॉर्ड सोडून 15 प्रभाग साठी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्ष वेशीला टांगला आहे. प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याचे बोलले जाते त्यामुळे आपल्या कारभारणीला राजकारणाचा प्यादा न करता इतरांचे प्रभाग मध्ये आपल्या पक्षाचे बळ वापरून स्वतःला उमेदवारी मिळवण्यासाठी परंपरागत विरोधकांसोबत हात मिळवण्यासाठी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्याच्या चौकटीवर बसून माझ्या पक्षाला युतीमध्ये जागा सोडा आणि ती जागा मीच लढविणार असा बालहट्ट धरल्याने प्रभाग चार मधील “उमा”चे पक्षातील कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात नाराज आहेत.खरे तर हाच “उमा” ताईच्या भरवशावर वाढला तोच उमा:ताईच्या विरोधक असलेल्या दिग्रस येथील भाऊच्या गळ्यातील सध्या ताईत झाल्याचे बोलल्या जाते.ज्या ताईने सख्या भावापलीकडे “उमा” भाऊ यांना प्रत्येक ठिकाणी तथा पुसद नगर परिषदेमध्ये विरोधाकांसोबत अभद्र युती करून बांधकाम सभापती पदावर विराजमान केले त्याच उमा ताई ऐवजी काही काळ पडद्यामागे पुसदचे भाऊंना आपला नेता म्हणून आपले बांधकाम सभापती पद मागील कार्यकाळात आपले उकळ पांढरे करून घेत त्याचे अक्षदा भाऊच्या दरबारात नेऊन उडविल्या. हल्ली ज्या “उमा “चा स्व प्रभाग सोडून प्रभाग क्रमांक 15 मध्ये मी उमेदवार व्हावा म्हणून मित्र पक्षाचा उंबरा झिजवत आहेत. याच उमा ने बांधकाम सभापती असताना आठवडी बाजारांमधील महसूल चे जागेवर लाखो रुपये खर्च करून भाजी मंडी व बाजार मंडीबांधली तिची किंमत आजच्या दहा वर्षाखाली 30 लाखाचे वर होती त्या भाजी मंडी मध्ये लाखोचा खर्च करून केवळ कमिशन खोरिसाठी केलेले बांधकाम आज मितीस वादग्रस्त ठरत आहे कारण आठवडी बाजारातील केलेल्या बांधकामावर पुसद महसूल प्रशासनाने दावा केला म्हणजेच याच उमा ने न. प. च्या शासकीय पैशाचा गैर वापर केला की नाही हा संशोधनाचा विषय आहे असे बोलले जाते. हल्ली महिला सक्षम झाल्या पाहिजे म्हणून नारा उठवल्या जातो परंतु स्वतः उच्च विद्या विभूषित असताना आपला प्रभाग महिलांसाठी आला असताना पत्नीला संधी देण्याऐवजी इतर प्रभागात जाऊन केवळ आणि केवळ पक्षाचे भरोशावर याच “उमा” ला उमेदवारी मिळावी म्हणून आपला पक्षां सोबत असलेल्या पक्षाच्या नेत्यासोबत गहाण ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या हाच “उमा” आपल्या पक्षाची दावेदरी करण्याऐवजी स्व प्रभागातील आपल्या पक्षातील कार्यकर्त्याला स्व पक्षाला युती मध्ये जागा मिळावी या वैतेरिक्त युतीतील पक्षाला ही जागा सोडून त्याच्या कोणत्या कार्यकर्त्याचा गेम करणार आहे हे त्या कार्यकर्त्याना समजणे महत्त्वाचे आहे तूर्तास एवढेच..! क्रमश या विषयातील भाग पॉलिटिक्स स्पेशल उद्या प्रकाशित करणार आहे , हे विशेष….!

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….