भीषण रेल्वे दुर्घटना..! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बिलासपूर :- “छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात आज एक भीषण रेल्वे अपघात घडला. कोरोबा पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडी यांची जोरदार धडक झाली. ज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दहा जणांचा मृत्यू झालेला आहे.
तर अनेकजण जखमी देखील आहेत. ही भीषण अपघात बिलासपूर-कटनी रेल्वे विभागाच्या लाल खदान भागात झाला.
दुर्घटनेची माहिती मिळाताच रेल्वेची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतर संपूर्ण मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली. साधारण दुपारी ४ वाजता हा अपघात झाला. ट्रेन क्रमांक ६८७३३ एका मालगाडीला धडकली.
वृत्तानुसार, ही टक्कर इतकी भीषण होती की त्यामुळे ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नल सिस्टीमचे मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की दुरुस्तीसाठी काही तास लागू शकतात, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
रेल्वेने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात सिग्नल बिघाड किंवा मानवी चूक ही संभाव्य कारणे असल्याचे दिसून आले आहे. प्रवाशांना कोणत्याही माहितीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन त्वरित मदत आणि समन्वय सुनिश्चित करत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….