निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर, ‘या’ तारखेला होणार नगरपंचायत व नगरपरिषदेची निवडणूक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागून राहिली होती, तो कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यभरात नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी निवडणूक होईल तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हापरिषद व महानगर पालिकांसाठीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.
राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रभरात नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. १० डिसेंबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातील.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
अर्ज दाखल करण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर २०२५मतदान – २ डिसेंबर २०२५मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५निकाल जाहीर करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….