‘ती’ माजी महिला खासदार पुन्हा भाजपात करणार प्रवेश…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “माजी खासदार डॉ. हिना गावित पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्या घरवापसीचा कार्यक्रम लवकरच पार पडणार आहे, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.
२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर खासदार झालेल्या डॉ. गावित यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, ज्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल कागडा पाडवी यांनी त्यांचा १,५९,१२० मतांनी पराभव केला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने भाजप जुन्या आणि प्रभावी नेत्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील गावित कुटुंबाचे राजकीय वजन लक्षात घेऊन डॉ. गावित यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत असून, त्यांच्या पुनरागमनामुळे नंदुरबारमधील भाजपच्या राजकीय समीकरणात बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….