हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात दिवाळीच्या आनंदसोबतच आता पावसाच्या सरीही अनुभवायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑक्टोबर हिटनंतर पुन्हा एकदा वातावरणात गारवा जाणवू लागला असून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात आकाशात ढग दाटून आले आहेत.
पुढील तीन दिवस हवामान बदलणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत लोकांना फटाके आणि लाडूंचा आनंद घेताना छत्री आणि रेनकोटचीही साथ घ्यावी लागणार आहे.
यलो अलर्ट असलेले जिल्हे –
23 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली.
24 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली.
25 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड आणि धाराशिव येथे पावसाची शक्यता आहे.
पुणे आणि आसपासच्या भागात काय आहे अंदाज?
पुणे जिल्ह्यात आज आकाश ढगाळ राहील, काही ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या भागात विशेषतः सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची अंदाज
लातूर, बीड, नांदेडसह मराठवाड्यातील भागात ढगाळ वातावरण राहील. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर आणि वर्धा येथेही वादळी वाऱ्यांसह सरींची शक्यता वर्तवली गेली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केलं असून, वीज पडण्याच्या शक्यतेमुळे उघड्यावर न राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद घेताना पावसाचा अंदाज लक्षात घेणं आवश्यक ठरणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….