मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त विधान केले. तसेच आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो अशीही कबुली मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
माध्यमांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. पवार यांनी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेले विधान चुकीचे असल्याचे सांगत याबाबत त्यांच्यासोबत बोलणार असल्याचे सांगितले.
“मी त्यांना शेतकऱ्यांच्याबाबतील केलेल विधानाबाबत बोलणार आहे. मी त्यांना काय सांगायचं ते सांगणार आहे. शेतकरी हा बळीराजा आहे. लाखाचा पोशींदा आहे.३२ हजार कोटींचे पॅकेज देताना मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान काय?
“लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी ठरवायला हवं की त्यांनी काय मागायचं आहे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास यांच्यासारखा माणूस गेला आणि लोकांनी सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार आहोत. लोकांनी काय मागावं हे ठरवावं. अनिलभाई आजची वेळ मारुन नेण्यासाठी नदीही देऊन टाकू तुला म्हणतील. म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागायचं हे ठरवायला हवं. निवडणुकीत निवडून यायचं आहे म्हणून आम्ही आश्वासने देतो,” असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..