माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाकाव :- “माजी मंत्री तानाजी सावंत यांचा वाकाव (ता. माढा) येथील बंगला पुराच्या पाण्याखाली गेला आहे. याचा व्हिडीओ काढण्यात आला असून यामध्ये त्यांच्या घराबाहेरील ट्रॅक्टर, दोन फॉर्च्युनर पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.
बोटीने त्यांच्या घरातील सदस्यांना वाचविण्यात आले आहे. अनेकजण बंगल्याच्या टेरेसवर थांबलेले आहेत. त्यांनाही बोटीने सुखरूप ठिकाणी नेण्यात येणार आहे. राज्यभरात भयानक पाऊस झाला आहे. हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत. सीना नदीला आला महापूर आल्याने सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातही मोठी अतिवृष्टी झाली आहेत. यामध्ये सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. 2 लाख 22 हजार 881 शेतकरी बाधित झाले आहेत. 11 तालुक्यातील तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे. या महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 6 लोकांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..