आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत चार्जशीट दाखल न झालेल्या गुन्ह्यांना माफी दिली जाणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे हजारो आंदोलकांवरील खटले संपुष्टात येणार असून, आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात AMY फाउंडेशनकडून या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा करत दाखल झालेल्या या याचिकेवर सुट्टीच्या दिवशी तातडीची सुनावणी घेण्यात आली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केले होते.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नोंदवलेले गुन्हे आता मागे घेतले जाणार असल्याने आंदोलकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.