आरक्षण टिकविण्यासाठी लढू ; आत्महत्या केलेल्या ओबीसी युवकाच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लातूर :- “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी अनेकांनी बलिदान दिले. ओबीसींना मंडल आयोगापासून आरक्षण मिळाले आहे. आता ते १७ टक्केच शिल्लक राहिले आहे.
त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचा ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठीचा लढा सुरू आहे. त्याचा पहिला बळी भरत कराड ठरला आहे. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, आमचा लढा तीव्र करू,’ असा निर्धार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर शासनाने काढला आहे. त्यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणाचे काय, अशी चिंता व्यक्त करत वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड (वय ३५) यांनी बुधवारी (ता. १०) मांजरा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली होती. मंत्री भुजबळ यांनी शुक्रवारी कराड कुटुंबाचे सांत्वन केले, ग्रामस्थांशी संवाद साधला. आमदार धनंजय मुंडे, आमदार रमेश कराड आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, ‘साळी- माळी, कोळी यासह अठरापगड ५२ टक्क्यांनी असलेल्या ओबीसींना आता केवळ १७ टक्के आरक्षण शिल्लक राहिले आहे. त्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण दिले तर मूळ ओबीसींवर मोठा अन्याय होणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे होऊ देणार नाही.
त्यासाठी ओबीसीतील सर्व समाजबांधवांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुट करावी. ओबीसींचे आरक्षण टिकविण्याच्या लढ्याला साथ द्यावी. या लढ्यात कोणत्याही ओबीसी बांधवाने कायदा हातात घेऊ नये. लोकशाही मार्गांचा अवलंब करावा. तसेच आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग अजिबात स्विकारू नये.’

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..