उपराष्ट्रपतिपद निवडणुकीतील फुटलेल्या मतांवरून सुप्रिया सुळे यांचा आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मते फुटल्याची माहिती सत्तेतील लोकांकडूनच दिली जात आहे. त्यामुळे राहुल गांधी वोटचोरीबद्दल बोलतात, त्याप्रमाणे हीदेखील वोटचोरीच आहे. फुटलेली मते ही महाराष्ट्राची आहेत, असे सांगत राज्याची बदनामी करण्याचा घाट घातला जात आहे.
त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जनसुरक्षा कायद्याविरोधात सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत सुळे म्हणाल्या, ”उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक मुळात गुप्त होती, तरीही फुटलेले मतदान ठराविक पक्षांचे होते, हे कसे समजले? भाजपचे वरिष्ठ नेते संजय जयस्वाल यांनी सांगितले, की ४० पैकी ११ मते ही वायएसआर काँग्रेसची आहेत.
मात्र वायएसआर ही इंडिया आघाडीत नाही. तसेच मला देण्यात आलेल्या कागदावर कोणताही क्रमांक नव्हता. गुप्त मतदान होते, त्याविषयी यांना कशी माहिती मिळाली, म्हणूनच आता राष्ट्रपतींना पत्र लिहावे लागेल.”
सुळे म्हणाल्या…
अमेरिकेच्या धोरणामुळे करात मोठे बदल होत आहेत
तलाठ्याला मारहाणीसारख्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष
सोलापूरच्या महिला पोलिस अधिकाऱ्याचा मला अभिमान
महिला अधिकाऱ्यांबाबतचे गलिच्छ राजकारण न शोभणारे

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..