नगरपालिकेच्या बसस्टँड परिसरात गाळ्यांवर अतिक्रमणाचा भांडाफोड ; भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित यांच्या सतर्कतेने उघड भोंगळ कारभार ; नगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी – गाळ्याचे शटर तोडून छुप्या पद्धतीने चालू असलेला गोरख धंदा उघड ; लाकडाचे गुटके, पाण्याची टाकी, हॉटेल व्यवसायाचे सामान गाळ्यात ; पंचनामा व व्हिडिओ चित्रणासह पुरावे ताब्यात ; नगरपालिकेच्या अधिकारी–कर्मचाऱ्यांची अतिक्रमणधारकांशी सांगड? ; कठोर कारवाई नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत धडकणार – अजय पुरोहित यांचा इशारा ; भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. आरतीताई फुपाटे यांच्या सूचनेवरून पुढाकार ; अतिक्रमणधारकांची धाबे दणाणली, प्रशासन हादरले ; नगरपालिकेच्या गाळ्यांवर छुपे अतिक्रमण उघड – भाजप पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने प्रशासन हादरले….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नगरपालिकेच्या बसस्टँड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील दुकानगाळ्यांवर अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने सुरू असलेला अवैध ताबा आणि अतिक्रमणाचा भोंगळ कारभार अखेर उघडकीस आला आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित यांच्या सतर्कतेमुळे या प्रकरणाचा भांडाफोड झाला असून, प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे.
अधिकाऱ्यांच्या संगनमताने एवढ्या वर्षांपासून सुरू असलेल्या या अतिक्रमणामुळे “हे गाळे आता खरंच मोकळे होणार का?”, “पैशाच्या पाईपलाईनने चालणारे नळ-कलेक्शन थांबणार का?” असे जनतेसमोरचे यक्षप्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
भाजपचा पुढाकार – प्रशासनाला घटनास्थळी बोलावले
यवतमाळ भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. आरतीताई फुपाटे यांच्या सूचनेवरून अजय पुरोहित यांनी पुढाकार घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून गाडी तोडून त्यामध्ये अतिक्रमण केले असल्याची माहिती देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा थेट घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले. नगरपालिकेचे पाण्याचे टाकी जवळील दुकान गळ्या पैकी एका दुकानाचे मागील बाजूस असलेले असे सेटर तोडून त्यामध्ये अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने गाळा ताब्यात घेऊन अतिक्रमण करून त्या ठिकाणावरून गळ्याच्या समोरील बाजूस हॉटेलचा अवैध व्यवसाय चालू असल्याचे उघड झाले आहे.
गाळ्यातील धक्कादायक वास्तव
तपासादरम्यान गाळ्यात टनाने लाकडाचे गुटके, शेकडो लिटरची पाण्याची टाकी, तसेच हॉटेल व्यवसायासाठी लागणारे साहित्य सापडले. या सर्व वस्तूंवरून नगरपालिकेच्या शासकीय मालमत्तेचा उघडपणे बेकायदेशीर वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंचनामा व पुरावे सुरक्षित
अजय पुरोहित यांनी “पंचनामा न करता मी माघारी जाणार नाही” अशी ठाम भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांना जागीच पंचनामा करून फोटो व व्हिडिओ चित्रणासह पुरावे ताब्यात घ्यावे लागले. या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारही उपस्थित होते.
कठोर कारवाईचा इशारा
“अवैध अतिक्रमण करणाऱ्यांवर आणि त्यांना हाताशी धरून संगनमत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सचिवालय गाठू” असा इशारा तक्रारदार अजय पुरोहित यांनी दिला आहे.
चर्चेला उधाण
या घटनेनंतर नगरपालिकेतील अधिकारी–कर्मचारी आणि अतिक्रमणधारकांमधील सांगड उघड झाल्याची चर्चा वेगाने पसरली आहे. भाजप पदाधिकाऱ्याकडून “कारवाईला विलंब नको” अशी मागणी होत असल्याने कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने जागृत होऊन कारवाईचा बडगा उगारणार का? असा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.