१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान झाले आहे. सायंकाळी सहा वाजता मतमोजणी सुरु झाली असून थोड्याच वेळात ७.४५ वाजता निकाल घोषित केला जाणार आहे.
अशातच या मतदानाला १३ खासदारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. एकूण ७८१ मतदान होणे अपेक्षित होते. परंतू, १३ मते पडलेली नाहीत. यामुळे आता 768 मतांची मोजणी केलाी जाणार आहे. मतदान न करणाऱ्यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि अपक्ष १ अशा खासदारांचा समावेश आहे. एनडीएच्या ४२७ खासदारांनी मतदान केले आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उमेदवार आहेत. तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत. सत्ताधारी असल्याने राधाकृष्ण यांचे पारडे जड असले तरी क्रॉस व्होटिंगही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच वायएसआरपीने अचानक आपल्या खासदारांची मते एनडीएला देण्याचे जाहीर केले होते. यामुळे एनडीएची ११ मते वाढणार आहेत. दोन्ही आघाड्यांचे नेते आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. भाजप प्रणित आघाडीला विजयाचा विश्वास असून त्यांनी सेलिब्रेशन डिनरची तयारी सुरु केली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..