हिवरा(सं) येथे पाच वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; माथेफिरू आरोपीला नागरिकांनी ठेवले बांधून ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
मानव जातीला काळीमा फासणारी घटना महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे घडली आहे .चार वर्षीय भाचीवर पंचवीस वर्षीय चुलत मामाने अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. पोलिसांनी माथेफिरू आरोपीला अटक केली असून पीडित मुलीला यवतमाळ येथे वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे चार वर्षीय बालीका घरा शेजारी खेळत होती. पिडीत मुलीचा माथेफिरू चुलत मामाने तीला फुस लावून निर्जनस्थळी नेले.आणि तीच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला . मुलीने आरडाओरड केल्याने माथेफिरू आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडुन बांधून ठेवले व त्याला चांगलाच चोप दिला. प्रचंड चीड येणाऱ्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे .या घटनेची माहिती हिवरा (सं) येथील पोलीस पाटील प्रवीण पाटील यांनी महागाव पोलीसांना दिली .महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लु यांनी घटनास्थळी भेट देवून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पिडीत मुलीला तात्काळ यवतमाळ येथे उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे .सदर प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पॉलिटिक्स स्पेशल ला मिळाली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..