आमदार किसनराव वानखेडेंनी बोलावली आपातकालीन बैठक ; विधानसभेतील सर्व विभागाचे अधिकारी हजर राहणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघात १५ ऑगष्ट पासून आजतायत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मतदार संघातील जवळपास १ लाख हेक्टर शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले तर अनेक घरे उद्धवस्त झालीत या नैसर्गिक आपत्ती टाळण्याच्या हेतूने उद्या दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आढावा बैठकीचे आयोजन उमरखेड पंचायत समीती सभागृहात करण्यात आले आहे .
.आमदार किसनराव वानखेडे यांनी हि बैठक बोलावली असून या आढावा बैठकीला झालेल्या नैसर्गिक आपत्ती संबंधीत असणारे. तहसिलदार उमरखेड / महागांव, तालुका कृषी अधिकारी उमरखेड / महागांव , कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ , कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद ,गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड / महागांव,उपमुख्य अभियंता (निर्माण) मध्य रेल्वे वर्धा , कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग 2 यवतमाळ,कार्यकारी अभियंता सिंचन विभाग पुसद, कार्यकारी अभियंता महावितरण विभाग पुसद / उमरखेड / ढाणकी / महागांव,प्रकल्प संचालक, भा. रा. रा. प्रा. नांदेड,कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड , उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड , उपविभागीय अधिकारी उध्वं पैनगंगा प्रकल्प सिंचन शाखा उमरखेड / महागांव, उपविभागीय अभियंता, मृद व जलसंधारण अधिकारी, उमरखेड , मुख्याधिकारी नगर परिषद उमरखेड / महागांव / ढाणकी , उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उमरखेड / महागांव,कार्यकारी अभियंता उध्वं पैनगंगा प्रकल्प नांदेड हे उपस्थित राहणार आहेत . या आढावा बैठकीत
उमरखेड उपविभागातील उमरखेड-महागाव या दोन्ही तालुक्यामध्ये दि.15/08/2025 व 16/08/2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीसह शेकडो घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती व त्यात शासनाच्या बऱ्याच यंत्रणांकडून झालेल्या चुकीच्या कामांमुळे रस्त्यावरून लगतच्या शेतांमध्ये व गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. एकंदरीत नैसर्गिक व कृत्रिम आपत्ती टाळण्याच्या हेतूने आमदार किसनराव वानखेडे अधिकाऱ्यांना सुचना करणार आहेत .

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..