“‘दारूचा घोट. नोटांची लाच..?’ – वडेट्टीवारांच्या विधानामागचं सत्य काय..?”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “नागपूरमधील बियर बार मध्ये अधिकारी आणि शासकीय फाईल असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. या फाईल्स कोणत्या विभागाच्या होत्या आणि हे अधिकार कोण होते. यासंदर्भात आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाले आहेत.
तर विरोधी पक्षांनी या घटनेचा आधार घेत सरकार आणि अधिकाऱ्यांवर टीका केली आहे.
पैसा आणि नशा एवढंच काम आता काही सरकारी बाबूंना उरलंय का? ना जबाबदारी, ना भीती. वरून दारूचा घोट, टेबलाखालून पैशाची नोट?, यांचे लोकसेवेचे भान हरवत चालले आहे. सरकारचा कुणालाच धाक उरलेला नाही, जनतेचे सरकारला काही पडले नाही. सरकार आणि अधिकारी यांचे मात्र सगळे ‘आनंदी-आनंद’ चालले आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर केली.
नागपुरातील मनीषमधील एका बारमधील व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती एक टेबलावर बसून आहेत आणि त्यातील. एक जण दारूचे घोट घेत शासकीय फायलींना पडताळताना व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले ‘हे’ अधिकारी नेमके कोण होते, ‘ते’ कोणत्या विभागाचे होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळत होते. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट रिचवत बीअर बारमध्ये चक्क ‘शासन’ सुरू केल्याची टीका आता समाज माध्यमांमधून केली जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या या शहरात नेमके चालले काय, असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
नागपुरातील मनीषनगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमधील हा प्रकार असून दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आलेत. त्यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक फायलींचा मोठा गठ्ठा देखील आणला होता. त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा गठ्ठा खोलून त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. मात्र, हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचे आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. ही घटना रविवार दुपारची आहे. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य बाहेर येऊ शकते, असा नागरिकांचे म्हणणे आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..