मोठा दिलासा : अप्पर पूस धरण (वसंतसागर) ओव्हरफ्लो तर ईसापुर धरण 66.43 टक्के भरले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
पुसद शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अप्पर पूस धरण वसंतसागर या प्रकल्पातून पाणी मिळते. पूसधरण हे शंभर टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे त्यामुळे शहराचे पिण्याचे पाण्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे त्यामुळे शहरासह तालुक्यात समाधान व्यक्त होत
आहे.
सततच्या पावसामुळे व धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे ईसापुर धरणात एकाच दिवसात तब्बल 7 टक्के पाणी आले असून आज ईसापुर धरणाची पाणी पातळी 66.43 टक्के झाली आहे.इसापूर धरणाच्या धरण क्षेत्रात मोठया प्रमाणात पावसाचे प्रमाण असल्यामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून हे धरण पुढील काही दिवसांत शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर असलेल्या धरणातील समाधानकारक पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे.
ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प ईसापुर धरण दैनिक पाणी पातळी अहवाल
दिनांक 18/08/2020
पाणी पातळी-{437.60}मिटर
पाणीसाठा- {640.42}द.ल.घ.मी .
टक्केवारी- {66.43%}
दैनिक पाऊस – 83 मिलीमीटर
एकूण पाऊस 732 मिली मिटर.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….