जिल्ह्यात ७० कोरोनाबाधित रुग्णांची भर ; ३६ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 17 ऑगस्ट :
जिल्ह्यात आज (दि. 17) नव्याने 70 कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 36 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 70 जणांमध्ये 47 पुरुष आणि 23 महिला आहेत. यात घाटंजी तालुक्यतील कुर्ली येथील दोन पुरुष, महागाव शहरातील एक महिला, महागाव तालुक्यातील गुंज येथील पाच पुरूष, यवतमाळ शहरातील सेवानगर येथील एक पुरूष, श्रीकृष्ण कॉलनी येथील एक पुरूष, शिवनेरी सोसायटी येथील एक पुरूष, गुरवाणी लेआऊट वाघापूर येथील एक पुरूष, तेलीपुरा येथील दोन पुरूष व तीन महिला, आठवडी बाजार येथील एक पुरूष, साईश्रद्धा हॉस्पीटल येथील एक पुरूष, गोदाम फैल येथील एक महिला, पाटीपुरा येथील एक पुरूष व तीन महिला, दाते कॉलेज शिवाजी नगर येथील एक पुरूष, चापनवाडी येथील एक पुरूष, माळीपुरा येथील एक पुरूष व तीन महिला, कावेरी नगर येथील एक महिला, शहराच्या इतर भागातील सहा पुरूष, आर्णी शहरातील चार पुरूष व एक महिला, पुसद शहरातील शेलू प्लॉट येथील दोन पुरूष व तीन महिला, मोती नगर येथील दोन पुरूष, बंजारा कॉलनी येथील एक पुरूष, वानोली येथील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील एक पुरूष, झरी जामणी तालुक्यातील मुकूटबन येथील दोन पुरूष, कळंब शहरातील सात पुरूष व तीन महिला, उमरखेड शहरातील दोन पुरूष व दोन महिला, दारव्हा शहरातील जैन मंदिर रोड येथील दोन महिलांचा समावेष आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 711 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2238 झाली आहे. यापैकी 1466 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 58 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 133 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 36652 नमुने पाठविले असून यापैकी 36131 प्राप्त तर 521 अप्राप्त आहेत. तसेच 33893 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….