विदर्भात पावसाची धुव्वाधार हजेरी; नागपूर विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस…!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “जूनमध्ये उशिरा दाखल झालेला मान्सून जुलैमध्ये मात्र, विदर्भात धुमाकूळ घालत आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल १२० टक्के अधिक पाऊस झाला असून, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवली.
गोंदिया, भंडारा, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जमिनीची ओल वाढली असली, तरी काही भागांमध्ये रस्ते, पूल यासारख्या सुविधा ढासळू लागल्याचेही दिसून येत आहे.
विदर्भासाठी जुलै महिना हवामानाच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक ठरला आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १२० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
विभागात २० पैकी ८ दिवस मुसळधार व १२ दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे नोंदविण्यात आले
सर्वाधिक पाऊस गोंदिया जिल्ह्यात (१९ दिवस)
नागपूर, भंडारा (१६ दिवस), चंद्रपूर, गडचिरोली (१८ दिवस), वर्धा (१७ दिवस)
नागपूर विभागातील पावसाच्या यशस्वी कामगिरीमुळे खरीप हंगामासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.