हिंदीसक्ती करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकावी, उद्धव ठाकरेंचा टोला….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करतोय असा गैरसमज करून घेऊ नका, पण कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लागू करू देणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला.
तसेच विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता की, महाविकास आघाडी सरकार असताना हा त्रिभाषा नियम लागू करण्यासाठी ठाकरेनी त्यावर सही केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी तो कागद दाखवला आणि त्यावरची तारीख दाखवली. 27 जानेवारी 2022 ही त्यावर तारीख असून आमचे सरकार जूनमध्येच पाडले होते. असे उद्धव ठाकरे म्हणाले.