‘मुलाच्या पोटी केरसुनी’, भाजप आमदाराने उद्धव ठाकरेंबद्दल वापरले वादग्रस्त शब्द…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ““बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सर्व देश हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही दुर्देवी बाब. गावाकडे आजी आमची म्हणायची, कोणी वारलं तर ते आपल्याकडे स्वर्गातून बघत असतात, त्याचप्रमाणे बाळासाहेब हे बघत असावेत, त्यांना किती वेदना होत असतील.
आमच्याकडे एक म्हण आहे, मुलाच्या पोटी केरसुनी जन्माला येते असे आम्ही म्हणतो. आज देशात हिंदुत्वाच वातावरण तयार झालं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्देवाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. त्यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणा बंद करावं” अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
“उद्धव ठाकरे यांना घरात बसायची वेळ भाजपमुळे आली आहे. लोकांनी 2024 ला त्याचा वाचपा काढला आणि भाजपला निवडून दिले. उद्धव ठाकरेंना रोज चार लोक सोडून जातात, त्यामुळे त्यांची मानसिकता खचली आहे. तुम्ही पण उद्धव ठाकरेंकडे जास्त लक्ष देऊ नका. उद्धव ठाकरे यांच्या घरी रोज लाल दिव्याच्या गाड्या जायच्या, आज त्यांच्या घरी कोणीही जात नाही. त्यामुळे आता भाजपचे माप काढण्यात वेळ वाया घालवू नये” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
संजय राऊत यांच्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून पूजा घालू
“संजय राऊत हे अडचणीत आहेत. त्यांना काही पूजा करायची असेल, तर त्यांनी मला सांगावं. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना शांती तरी लागेल. महाविकास आघाडीतील नेत्यांना निवडून येण्याची शाश्वती नाही. संजय राऊत यांना जर चांगली पूजा घालायची असेल, तर मी त्यांना बगलामुखीची पूजा घालून देतो. संजय राऊत ज्या ठिकाणी सांगतील, त्या ठिकाणी पूजा करतो. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान असेल, त्यांना जिथे वाटते तिथे पूजा घालतो. संजय राऊत यांनाही चांगली सुबुद्धी यावी. पूजा करणं गरजेचं आहे. त्यासाठी 101 ब्राह्मण बोलवून आपण पूजा करू” असं संजय राऊत म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..