काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्याम चव्हाण यांनी संपवले जीवन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
परभणी :- “पाणंद रस्ता रोखल्याने मानसिक तणावातून काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष श्याम चव्हाण (वय ५४) यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
श्याम चव्हाण यांचा मानवत शिवारात खडी क्रशर मशीनचा व्यवसाय आहे. त्यांच्या जागेच्या शेजारी दोन वर्षांपूर्वी शहरातील शिवाजी दहे यांनी जमीन खरेदी केली होती. या शेतातून पाणंद रस्ता होता.
हा रस्ता शिवाजी दहे यांनी रहदारीसाठी बंद केल्याने वाद होत होता. या प्रकरणाची तहसीलदार यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर हा रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्याचा आदेश देण्यात आला. असे असताना दहे या रस्तावर रहदारी करू देत नव्हते. या कारणाने श्याम चव्हाण मागील काही दिवसांपासून तणावात होते.
या तणावात गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी राहत्या घरामागील गोदामात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचे बंधू बालाजी चव्हाण यांच्या तक्रारीवरून शिवाजी विठ्ठलराव दहे आणि अमर शिवाजी दहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. श्याम चव्हाण मागील दहा वर्षांपासून काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
खिशात सापडली चिठ्ठी
मृत श्याम चव्हाण यांच्या पँटच्या मागील खिशात एक चिठ्ठी आढळली. यात ‘शिवाजी विठ्ठलराव दहे व अमर शिवाजी दहे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवत आहे’, असा मजकूर लिहला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..