शालेय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने संघटनांची सभा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 20 :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी ही मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांची आहे. त्या अनुषंगाने स्पर्धा आयोजनाकरीता जिल्हास्तरीय क्रीडा संघटनांची सभा दि. 24 जून रोजी सकाळी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
क्रीडा स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारची तांत्रिक तक्रार, वाद होणार नाही व स्पर्धा सुव्यवस्थित होण्याकरीता एकविध क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेची नोंदणी दस्तऐवज, राज्य संघटनेचे मान्यता प्रमाणपत्र व अधिकृत पंचांची यादी सभेसाठी येतांना घेऊन यावी. या वर्षीच्या स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या होण्याकरीता एकविध क्रीडा संघटनेच्या अध्यक्ष, सचिव यांनी न चुकता सभेमध्ये उपस्थित रहावे, असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..