पुसद व उमरखेड शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 20 :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतिगृह पुसद व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, उमरखेड येथे रिक्त जागेवर ऑनलाईन प्रवेश प्रकिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामिण भागातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देणे सुरू आहे. या वसतिगृहात मोफत निवास, भोजनाची व्यवस्था, ग्रंथालय, संगणक कक्ष, मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश, खेळाचे साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहे. अनुसूचित जातीसाठी 80 टक्के, अनुसूचित जमाती 3 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी 5 टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी 3 टक्के, अनाथ 2 टक्के व अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा राखीव आहे.
इच्छुक विद्यार्थ्यानीhttps://hmasmahaitorg या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक आर.बि. बोंतावार यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..