महागाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव ; दुपारपर्यंत ९ कोरोना बाधित रुग्ण आढळले # गुंज ५ तर शिरपूर येथील ४ जणांचा समावेश ; आकडा वाढण्याची शक्यता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला असून दिवसागणिक ग्रामीण भागातील कोरोना बाधित आकडे फुगे लागले आहेत.गुंज येथील डॉक्टर, मेडिकल व्यवसायिक प्रत्येकी एक, आणि शिरपूर येथील एका प्रतिष्ठित व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळं यंत्रणेने गुंज आणि शिरपुर गावात आपला ठिय्या देत संशयितांची कोरोना तपासणी शिबिर हाती घेतली आहे.त्यात आज १५ ऑगस्ट रोजी दुपार पर्यंत गुंज आणि शिरपूर येथील तब्बल ९ जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.त्यात गुंज ५ तर शिरपूर येथील ४ जणांचा समावेश आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील एका प्रतिष्ठित व्यक्ती अकोला येथील उपचारार्थ दाखल होता.त्यात सदर रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सदर रुग्णाच्या निकटवर्तीय संपर्कात आलेल्या संशयितांची तपासणी करण्यात आली त्यात दोघे आढळले होते .लगेच पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या ची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने तपासणी शिबिर हाती घेतली. त्यात जिल्हा प्रशासनाकडे संशयितांचे जवळपास ११६ नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील ९० च्या जवळपास अहवाल प्राप्त झाल्याने त्यामध्ये आज दुपारपर्यंत ४ कोरोना बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे.तर गुंज येथील डॉक्टर आणि मेडिकल व्यवसायिकास कोरोनाची लागण झाल्याने गुंज येथेही आरोग्य विभागाने चाचणी शिबिर हाती घेतली आहे. त्यामध्ये दुपारपर्यंत आज ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील आजचा आकडा ९ वर पोहोचला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे तर यापेक्षाही दिवसभरातील आज वाढू शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….