अहमदाबाद विमान अपघातातून विश्वशकुमार रमेश बचावला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- “अहमदाबाद येथे 12 गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळले असून या अपघातामध्ये एक प्रवासी वाचला असल्याची माहिती अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी दिली आहे.
फोनवर बोलताना त्यांनीही माहिती दिली आहे. पोलिसांना 11 ए सीटवर बसलेला प्रवासी जिवंत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतांची संख्या अद्याप सांगता येत नाही. विमान निवासी भागात कोसळल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. असं पोलीस आयुक्त जीएस मलीक यांनी एएनआयला माहिती दिली आहे.
रमेश विश्वास कुमार असं या वाचलेल्या प्रवासीचे नाव आहे. आज दुपारी मेघानीनगर परिसरात घडलेल्या या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील निधन झाला आहे. विजय रुपाणी यांच्यासह या अपघातामध्ये 240 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची देखील माहिती मिळाली आहे. मात्र सरकारकडून आतापर्यंत यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सध्या घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. या बचावकार्यात लष्कराचे 130 पेक्षा जास्त जवान काम करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी (12 जून) अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर लगेच बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दुपारी 1.38 कोसळले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..