अहमदाबाद विमान अपघाग्रस्त विमानात खासदार सुनील तटकरेंच्या भाचे सुनेचाही मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अहमदाबाद :- “गुजरात विमान अपघातात सुनील तटकरेंच्या भाचे सुनेचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. अपर्णा महाडिक असे तटकरे यांच्या भाचे सुनेचे नाव असून, त्या एअर इंडिया अपघाग्रस्त विमानात क्रू मेंबर म्हणून उपस्थित होत्या.
अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या सख्या भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या आणि दुपारीची फ्लाईट होती. अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडीयामध्ये आहेत.
विमानातील क्रू मेंबर्सची नावे खालीलप्रमाणे
क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर
सुमित सबरवाल
अपर्णा महाडिक
श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1
दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2
इरफान शेख
नंथेम सिंगसेन
मैथिली पाटील
मनीषा थापा
उड्डाणानंतर दहा मिनिटात अपघात
याच विमानामध्ये क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचे सून असून या देखील याच विमानात होत्या अशी माहिती समोर येत आहे. एअर इंडियाचं हे विमान उडान घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच रहिवाशी परिसरात कोसळल्याने अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. शिवाय गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील प्रवास करत होते. गुजरात मधील राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री रूपानी यांचा देखील मृत्यू झाला असं ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र त्यांनी काही वेळाने ट्विट डिलीट केलं. Ahmedabad Plane Crash
एअर इंडियाचे विमान कसं कोसळले?
फ्लाइट एआय 171 अहमदाबादहून लंडनला जात होती. अहमदाबाद हॉर्स कॅम्पजवळ हा अपघात झाला. विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान टेक-ऑफ दरम्यान कोसळले. बोईंग विमानाने आधी पेट घेतला आणि नंतर कोसळलं. विमानाचा मागचा भाग झाडाला धडकल्याने अपघात झाला असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं देखील सांगितलं जातंय.
विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान, अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा असोसिएटेड प्रेस या संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे. अपघातग्रस्त विमानात एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बोईंग ७८७-८ ने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले. त्यात २४२ प्रवासी होते, त्यापैकी १२ क्रू मेंबर्स होते, उर्वरित २३० प्रवाशांपैकी बहुतेक १६९ भारतीय होते. ५३ ब्रिटिश नागरिक होते, १ प्रवासी कॅनडाचा होता आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..