..तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची ठिणगी पेटणार; खासदार लंकेंनी दिला इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “शेतकरी, दिव्यांग आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग उपोषण सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
सरकारने ठोस निर्णय घ्यावा असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणारे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मोझरी येथे भेटून त्यांनी जाहीर पाठिंबा दिला व उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, बच्चू कडू गेले चार दिवसांपासून जनतेच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण करत आहेत. हे उपोषण सर्वसामान्य माणसांच्या हक्कांसाठीची लढाई आहे. या आंदोलनाला माझा पाठिंबा राहिल असे लंके यांनी सांगितले.
हे सरकार जाड कातड्याचे सरकार आहे. जर सरकारने लवकर योग्य निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाची ठिणगी पेटवल्याशिवाय आपण सर्वांनी स्वस्थ बसायचं नाही. मी माझ्या भागातही निर्णय लवकर झाला नाही तर बच्चू भाऊंना पाठींबा म्हणून आंदोलन करणार असा इशारा निलेश लंके यांनी यावेळी दिला.
भारत हा कृषिप्रधान देश असून शेती व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेती व शेतकऱ्यांसह शेतात राबणारे कष्टकरी, शेतमजूर तसेच दिव्यांग, महिला यांच्या न्याय हक्कांसाठी हा लढा बच्चू कडू देत आहात, हा विषय अतिशय महत्वाचा असून संवेदनशील आहे. सेंद्रिय खताला अनुदान देणे, शेतमजुरांना किमान मजुरी देणे, युवकांना रोजगार देणे, दिव्यांग व महिलांना मानधन देणे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास हमीभाव देणे अशा विविध मागण्यांसाठी आपण अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहात.
ही लढाई सर्व वंचित, उपेक्षित आणि गरजू समाजबांधवांसाठी असून आम्हीही या लढ्यात आपल्यासोबत आहोत. बच्चू कडू आपणही आपली काळजी घ्यावी. महाराष्ट्र सरकारने आपल्या या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी आणि जनतेच्या वर्तमान आणि भविष्यातील हितांसाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..