नौसेनेच्या सागरी हल्ल्यात कराची बंदर संपूर्ण उद्ध्वस्त…! 1971 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला समुद्रातून प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौसेनेने ऐतिहासिक पाऊल उचलत कराची बंदरावर जोरदार सागरी हल्ला केला आहे. 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा हल्ला करण्यात आला आहे.
या हल्ल्यात कराची बंदर पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आयएनएस विक्रांतचा निर्णायक वापर
भारतीय नौसेनेचा ‘INS Vikrant’ हा एअरक्राफ्ट कॅरियर आधीच अरबी समुद्रात तैनात करण्यात आला होता. या स्ट्राइक ग्रुपमध्ये एक विमानवाहू जहाज, विध्वंसक, फ्रिगेट, पनडुब्बी रोधी युद्धपोत आणि अनेक सहायक जहाजांचा समावेश होता. याच सामर्थ्याच्या जोरावर नौसेनेने कराची बंदरावर मिसाइलचा पाऊस पाडत पाकिस्तानला धक्का दिला.
भारतीय लष्कराकडून प्रत्युत्तर
पाकिस्तानने पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर जणू युद्ध छेडण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या तिन्ही संरक्षण दलांनी संयुक्त कारवाई करत पाकिस्तानच्या अंतर्गत अतिरेकी तळांवर आधीच हल्ला केला होता. कराची बंदरावरील हा हल्ला त्याच उत्तराचा भाग असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानी जेट्स आणि ड्रोन पाडले
भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी देखील जागरूकतेचं दर्शन घडवलं आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जम्मू आणि पंजाबच्या विविध भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने वेळेत प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे F-16 आणि दोन JF-17 लढाऊ विमाने पाडली आहेत. इतकंच नव्हे तर, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या त्यांच्या एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) ला देखील निष्प्रभ केलं आहे.
ड्रोन हल्ल्यांची सुद्धा केलेली प्रत्युत्तर कारवाई
राजस्थानच्या जैसलमेर आणि जम्मू-कश्मीरच्या उधमपूर भागात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांनाही भारतीय यंत्रणांनी निष्फळ ठरवलं. अखनूरमध्ये एक ड्रोन पाडण्यात आला, तर पुंछमध्ये दोन कामिकेज ड्रोन हवेतच निष्प्रभ करण्यात आले.
पाकिस्तानकडून भारतातील ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न
भारत-पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानने मध्यरात्री भारतातील विविध ठिकाणांवर मिसाईल व ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. जम्मू सिव्हिल एअरपोर्टवर पाकिस्तानकडून आलेला ड्रोन कोसळला, यामुळे भारताच्या फाइटर जेट्सनी तात्काळ प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या हल्ल्यांचा प्रभाव निष्फळ ठरवला.
भारतीय नौसेनेचा कराचीवर झालेला हा सागरी हल्ला केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक संदेश आहे. भारत आपल्या सुरक्षेबाबत पूर्णपणे सजग आहे आणि कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे. सध्या देशातील नागरिकांनी संयम बाळगावा आणि संरक्षण दलांवर पूर्ण विश्वास ठेवावा, असं आवाहन सरकारने केलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..