लाडक्या बहिणींसाठी आता राज्य सरकार काढणार दरमहा ३००० कोटींचे कर्ज…! १.३२ लाख कोटींच्या कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना लाभ वितरीत करण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे.
त्यातील साधारणत: तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.
एकूण कर्जाची सद्य:स्थिती
वर्ष एकूण कर्ज
२०२३-२४ ७,१८,५०७ कोटी
२०२४-२५ ८,३९,२७५ कोटी
२०२५-२६ ९,३२,२४२ कोटी
(स्थानिक निवडणुकांमुळे दरमहा मिळणार लाभ) राज्यात आता जून ते डिसेंबर या काळात राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. याशिवाय दिवाळीत अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुकांची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणी नाराज होऊ नयेत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी कर्जाची रक्कम त्यांच्या लाभासाठी वापरली जाणार असून दरमहा २५ तारखेपूर्वी लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या तीन टक्के कर्ज म्हणून सरकारला घेता येते. त्यानुसार राज्य सरकारने केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे कर्जाचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात राज्यातील सिंचन योजना, उत्तन ते विरार कोस्टल रोड अशा बाबींचा समावेश आहे. केंद्राकडून मेअखेर त्यास परवानगी मिळेल. त्यानंतर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून कोणत्या महिन्यात किंवा आठवड्याला सरकार किती कर्ज घेणार, याचे वार्षिक कॅलेंडर निश्चित होईल. त्यानुसार राज्य सरकार कर्ज घेऊन वैयक्तिक योजनांचा खर्च भागविणार असून अन्य रक्कम महत्त्वपूर्ण योजनांसाठी विशेषत: सिंचन योजनांसाठी दिली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोरोनानंतर राज्य सरकारने चार लाख १३ हजार १५६ कोटींचे कर्ज घेतल्याची नोंद सरकारच्या अर्थसंकल्पात आहे. २०१५-१६ ते २०२५-२६ या दहा वर्षांत सरकारच्या डोक्यावर सहा लाख कोटींचे कर्ज वाढले आहे. त्यापोटी सरकारला दरमहा ६१ हजार कोटींपर्यंत व्याज द्यावे लागत असल्याचीही नोंद अर्थसंकल्पाच्या पिंक बूकमध्ये आहे.सोलापूर : शासनाच्या सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना लाभ वितरीत करण्यात आला. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानंतर आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर २०२५-२६ या आर्थिक वर्षात एक लाख ३२ हजार कोटींचे कर्ज घेणार आहे. त्यातील साधारणत: तीन हजार कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार असल्याची माहिती वित्त विभागातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..