महसुल प्रशासनाच्या सहमतीनेच महागाव मध्ये रेती सह गौण खनिज तस्करी जोमात ; टिप्पर ला 90 हजार महिना तर ट्रॅक्टरला तीस हजार रुपये महिना ची वसुली करून रात्रंदिवस खुले आम तस्करी ; तहसीलदार बनले हस्तकांच्या हातातील बाहुले….
रितेश पुरोहित
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- रेती तस्करी रोखण्यासाठी तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सिंगल यांनी दिले आहेत परंतु महागाव तालुक्यात दस्तुरखुद्द तहसीलदार रेती तस्करांना आपल्या वाहनात घेवुन फिरत असल्याचे चित्र रोजच पहावयास मिळत असल्याने त्यांच्या संमतीनेच तालुक्यात रेती सह गौण तस्करी जोमात सुरू असुन हस्तकांच्या इशाऱ्यावर तहसीलदार नाचत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
महागाव तालुक्यातील नदी नाल्यांवरून रेती चा अवैध्य उपसा सुरू आहे धनोडा फुलसावंगी करंजखेड हिवरा भोसा व छोट्या-मोठ्या नाल्यांवरून या ठिकाणावरून मोठमोठे टिप्पर हायवा ट्रॅक्टरने ही तस्करी होते
पुसद येथील 25 टिप्पर अर्णी येथील 20 टिप्पर धनोडा व भोसा लगत मधील मराठवाड्यातील 25 टिप्पर असे जवळपास 60 ते 70 टिप्पर खुलेआम रात्रंदिवस चालतात तसेच तालुक्यातील छोट मोठ्या नाल्यांवरून नद्यांवरून ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात देती चोरून विकल्या जात आहे
फुलसावंगी येथे तर पाच ट्रॅक्टर नाल्या व नदीतून दिवसभर रेती काढून ठेवतात व पुसद येथील दलालांना टिप्पर भरून देतात हा गोरख धंदा जोरात सुरू आहे तहसील प्रशासन स्वतः यामध्ये समाविष्ट आहे प्रत्येक टिप्परला दर महिन्या खाली नव्वद हजार रुपये हप्ता तर ट्रॅक्टरला तीस हजार रुपय महिना हप्ता आहे बाकी ग्रामीण भागातून भरणारे ट्रॅक्टर यांना रात्री वेळ रात्री पकडून त्यांच्याकडून परस्पर पन्नास हजार ते लाख रुपये घेऊन ते ट्रॅक्टर सोडल्या जातात उमरखेड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महागाव तहसीलदाराची चांगलीच कान उघडनी केली होती परंतु बोटावर मोजण्या इतक्या कारवाया केल्यानंतर परत जैसे थे करत आता तर रात्रंदिवस रेती मुरूम दगड खुलेआम तस्करी होत आहे
शेतच कुंपण खात असल्याने कारवाई नेमकी कोणावर करायची असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
जिल्ह्यातील रेती तस्करीचा आतंक वाढला आहे त्यामुळे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची बैठक आयोजित करून रेती व गौण खनिज तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.परंतु महागाव तालुक्याचे तहसीलदार गौण खनिज तस्करांच्या दावणीला बांधल्या सारखे वागत असुन आपल्या शासकीय वाहनात या रेती तस्करी करणाऱ्यांनाच सोबत घेवुन फिरत असल्याचे चित्र जगजाहीर आहे.
तसेच रेती तस्करांवर कारवाई करण्याच्या नावावर त्यांनी नेमलेल्या हस्तकांमार्फत कारवाईचा निपटारा करण्याच्या नावावर जोरदार वसुली केल्या जात आहे. हस्तक म्हणतील त्याच गौण खनिज तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई तहसीलदार करीत असल्याने त्यांच्या संमतीनेच तालुक्यात रेती तस्करीचा धंदा जोमात सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दखविन्याचे धाडस तहसीलदार स्वतःच करीत असल्याने
तहसील व तहसीलदारांच्या केबिन मधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणे गरजेचे आहे त्यामुळे तालुक्यातील जनता घंटो घंटे बाहेर तहसीलदारांची भेट घेण्याकरिता बसून राहतात परंतु तहसीलदाराचे हस्तक दिवसभर केबिनमध्ये बसून राहतात तर रात्रभर विश्रामगृहावर तालुक्यातील रेती तस्करांची रात्री तीन ते चार वाजेपर्यंत रेलचेल असते
या संबंधित बाबीचे पुराव्यासह तालुक्यातील सुज्ञ नागरिक व पत्रकार यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्तांना भेटण्याकरिता लवकरच जाणार असल्याचे कळते.
दलालामार्फत वसुली जोमात सुरू..?
महागाव याठिकाणी कार्यरत असलेले तहसीलदार या अगोदर पुर्वीच्या ठिकाणी कर्तव्यावर असताना एका मोठ्या प्रकरणात अडकल्याने ते निलंबित सुध्दा झालेले आहेत.त्यामुळे महागाव सारख्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू झाल्या पासुन त्यांनी रेती तस्करी,माती,मुरूम तस्करी करणाऱ्यांकडून तसेच शेतकऱ्यांच्या फेरफार व इतर महत्वाच्या काम करून देण्याच्या नावावर वसुली करण्यासाठी विशेष हस्तक नेमलेले आहेत.मार्फत वसुलीचा धंदा जोमात सुरू असल्याने या वसुलीला शेतकरी मात्र चांगलेच वैतागले असुन तहसीलदार यांचे कॉल डिटेल्स तपासल्यास मोठ मोठे कारनामे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..