महागाव तहसीलच्या अनागोंदी कारभाराने तालुक्यातील जनता हैराण ; विभागीय आयुक्ताकडे जनता मागणार दाद दलालांचा हस्तक्षेप….
दलालांचा हस्तक्षेप
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रितेश पुरोहित
यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील मराठवाड्याच्या टोकावर असलेला महागाव तालुका कधीकाळी सुजलाम सुफलाम होता. परंतु तहसील मध्ये पनिशमेंट वर आलेले अधिकारी या तालुक्यातील जनतेला लुबाडत आहेत. दलालाना हाताखाली धरून दर दिवशी लाखोंची वसुली करीत आहेत. अँटी करप्शन मध्ये अडकलेले अधिकारी आज या तहसील मध्ये कारभारी झाले आहेत. महागाव तालुक्यातील जनतेने अशा अनेक अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. या तालुक्यात अनेक घोटाळे झाले आहेत,यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी,तहसीलदार,लिपिक तथा अनेक कर्मचारी यांच्यावर फौजदारी कारवाई झालेली आहे. सध्या हीच परिस्थिती महागाव तहसील मध्ये उद्भवत आहे.
रात्रपाळी करून लाखोंची कमाई केल्या जात आहे,परंतु या विषयावर विद्यमान आमदार तथा लोकप्रतिनिधी यांची याला मुख संबंधी आहे. महसूल मधील अनेक फेरफार गोणखणीजाची तस्करी तथा अनेक कारभारा मधून दर दिवशी लाखोंची माया गोळा केल्या जात आहे. रात्रपाळी करून रेतीचे ट्रक टिप्पर ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी परस्पर लाखो रुपये घेऊन सोडल्या जात आहे. विभागीय आयुक्त यांनी यवतमाळ जिल्हा अधिकाऱ्या समक्ष मीटिंग घेऊन या तस्करांवर मोका लावण्याचे आदेश दिले,परंतु तहसीलचे मुख्य अधिकारी आयुक्तांच्या आदेशांना जुमानत नाही आहेत. कधीतरी एखादी थातूरमातूर कारवाई करून स्वतःला धन्य मनुंन आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. महिने महिने शासकीय निवासस्थानी थांबून यांनी आपला बाजार थाटला आहे.
खरे तर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे,परंतु या अधिकाऱ्यांवर कुणाची ही नियंत्रण नाही. का असा सवाल निर्माण झाला आहे. पनिशमेंट वर आलेले अधिकारी या तहसील ला कसे प्राप्त होतात? याला लोकप्रतिनिधी कशी मूक समती देतात? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. रात्रभर लाल दिव्याची गाडी घेऊन फिरायचे, कारवाईच्या नावावर दौरे आखायचे आणि लाखोंची वसुली करून गौण खनिजावर कारवाई करण्याऐवजी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतल्या जात आहे. तालुक्यात सध्या विविध समस्यांचा ढिगारा लागला आहे.
तहसीलचे मुख्याधिकारी शासकीय कर्मचाऱ्याऐवजी हितचिंतकांना घेऊन गाडीमध्ये फिरत आहेत. लाच लुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अनेक वेळा कारवाई झाल्यानंतर त्यांनी या मध्येस त्यांना हाताखाली धरले आहे. कारवाईचा धसका परंतु आर्थिक लालसे पोटी हे अधिकारी मध्येस त्यांच्या हाताने दर दिवशी लाखोंची वसुली करत आहे. जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त यांच्याकडे तालुक्यातील सुज्ञ जनता दाद मागणार आहे. अनेकांकडे या अधिकाऱ्यांची फोटोग्राफी तथा व्हिडिओ शूटिंग उपलब्ध असल्याचे बोलल्या जात आहे. तहसील मधील छोटे-मोठे काम असो की कोणतेही काम असो दलालांच्या हस्तक्षेपा शिवाय कामच होत नाही. तहसीलच्या या मुख्य अधिकाऱ्यांची कॉल डिटेल्स काढल्यास सर्व बाबी समोर निश्चितच येतील यात काही शंका नाही.
तालुक्यातील जनता या विषयाने प्रचंड त्रस्त झाली आहे. जनसामान्याच्या आयकर मधून या अधिकाऱ्यांचा पगार होतो हाच त्यांना नेमका विसर पडलेला आहे. “माझे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही सर्वच माझ्याच खिशात आहेत जिल्हा अधिकारी असो की आयुक्त असो हे सर्व माझेच आहे त्यामुळे माझे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही” अशा अविर्भावामध्ये वागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आता तालुक्यातील सुज्ञ नागरिक यांनी उठाव करण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील मुख्य अधिकार यांनी शासकीय निवासस्थानावर महिनो महिने आपला डेरा टाकून रात्र रात्रभर सेटिंग करून ब्लॅकमेलिंग चा धंदा सुरू केला आहे. जरी शासकीय निवासस्थानावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील तरी त्या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या दुकाना तील सीसी टीव्ही ची तपासणी केली तरी सर्व पित्तळ उघडे पडेल.
तालुक्यातील शेतकरी अनेक समस्येने हतबल आहेत. नैसर्गिक संकट नापिकी तथा विविध समस्यांनी शेतकरी हैराण आहेत,परंतु अधिकारी मात्र गौण खनिजामध्येच मग्न आहेत.कारवाईच्या नावावर केवळ आणि केवळ सेटलमेंट करून दर दिवशी लाखोचा मलिदा लाटत आहेत. अनेक बाबी अशा तर ज्यांनी सेटलमेंट ला सहकार्य केले नाही त्यांचे ट्रॅक्टर टिप्पर सह इतर वाहने तहसीलला लावल्या जातात परंतु परस्पर नंतर मध्येस त्यांच्या हस्तक्षेपाने परस्पर सोडल्या जातात अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. रात्रीच्या अधिकाऱ्यांच्या तपासणी मध्ये मागील कित्येक महिन्यापासून किती कारवाया झाल्या हा संशोधनाचा विषय आहे,परंतु आता तालुक्यातील नागरिकांकडून जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्तांकडे याबाबत रीतसर तक्रार दाखल करून यावर कारवाई करण्याची मागणी होणार आहे. शासकीय पदाचा व शासकीय वाहनाचा दर रात्री केवळ वसुलीसाठी उपयोग केल्या जात असल्याने त्यांच्यावर शासकीय नियमानुसार कारवाई न झाल्यास या विषयाबाबत विशेष आंदोलन छेडून या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होणार असल्याचे जनते कडून बोलल्या आहे आहे. तहसीलच्या मुख्य अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स काढून त्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..