मुंबईला मिळणार तिसरे विमानतळ, अजित पवारांची मोठी घोषणा, उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीचा मेगाप्लॅनच सांगितला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी दिलखुलासपणे अनेक विषयांवर मत मांडले आहे. अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना बंद करणार नाही.
हा आमचा निर्धार आहे. या योजनेसासाठी ४० ते ४५ हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच बरोबर काटकसर देखील आम्ही करत आहोत, असं त्यांनी यावेळी सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले की, वाढवणला आम्ही नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ करु पाहत आहोत. म्हणजे मुंबईला तीन विमानतळ होतील. अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. हिंदी वादावर बोलताना ते म्हणाले की, हिंदी शिकवण्यात वाईट काय आहे? स्पर्धेच्या युगात मुले टिकली पाहीजेत. यासाठी ही तिसरी भाषा आहे. मराठी भाषकांना हिंदी शिकणे सोपे जाते. बोलताना तारतम्य ठेवले पाहीजे. राज ठाकरे यांच्यावर हिंदीच्या वादावर त्यांनी अशी टीका केली आहे.
ते म्हणाले की, एआयचा वापर केल्याशिवाय पुढील काळात पर्याय राहणार नाही. आधी साक्षर – निरक्षर होते. नंतर संगणक साक्षर आले. आता एआय आले आहे. एआय साठी ५०० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात ठेवली आहे. मी उपमुख्यमंत्री असलो तरी बारामतीला गेल्यावर शेतात एक चक्कर टाकतोच. तसा आपला शेतकरी हुशार आहे. त्याला कळले की एआयमध्ये फायदा तर तो नक्कीच त्याचा स्वीकार करेल. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक सोयाबीनची खरेदी यावेळी आम्ही केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. त्यामुळे नाराजी आहे. ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुका व्हायलाच पाहिजेत. ओबीसींना या निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. म्हणून कोर्टात गेले. आता आपली न्याय व्यवस्था आहे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा आधिकार आम्हाला नाही. तो निकाल येईल त्यावेळी ठरेल. या लांबलेल्या निवडणुकांमुळे गटार, रस्त्यांची कामे आमदार खासदारांकडे यायला लागली. त्याचा फटका आम्हाला लोकसभेला बसला, असं अजित पवार म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..