अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ई-मेल आला, सुरक्षा यंत्रणा अलर्ट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अयोध्या :- “अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तशा आशयाचा एक ई मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आला आहे.
सोमवारी रात्री हा धमकीचा ई मेल आला होता. या प्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोमवारी रात्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या मेलवर धमकीचा मेल आला होता. ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’ असं त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं. धमकीचा मेल मिळाल्यानंतर व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली. राम मंदिर ट्रस्टने एफआयआर दाखल केला आहे.
धमकीचा मेल तामिळनाडूतून
अयोध्येसोबतच बाराबंकी आणि चंदौलीसह इतर अनेक जिल्ह्यांनाही धमकीचे मेल आले आहेत. बाराबंकी आणि चंदौलीच्या डीएमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. अयोध्या आणि इतर जिल्ह्यांना पाठवलेला धमकीचा मेल हा तामिळनाडूतून आला असल्याची माहिती आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर सायबर सेल पाठवलेल्या ईमेलची चौकशी करत आहे
देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..